शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 11:01 IST

सुगावा प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रबोधनात्मक परिवर्तनवादी साहित्याची निर्मिती केली. विविध  पुरोगामी संस्था-संघटना यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता.

पुणे- सुगावा प्रकाशनाचे सर्वेसर्वा, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे अग्रदूत, आंतरजातीय धर्मीय विवाह चळवळीचे अग्रणी, तसेच वंचित, दुर्लक्षीत समाज घटकांच्या शिक्षणासाठी झटणारे प्रा. विलास वाघ यांचे गुरुवारी (दि.25) पहाटे 6 वाजताच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. सुगावा प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रबोधनात्मक परिवर्तनवादी साहित्याची निर्मिती केली. विविध  पुरोगामी संस्था-संघटना यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. (Senior Social Worker Vilas Wagh passes away)

प्रा. विलास वाघ यांच्या जीवन प्रवासावर एक नजर -- 1 मार्च 1939 रोजी जन्म : मोराने तालुका जिल्हा धुळे- पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण मोराणे- पाचवी ते अकरावी माध्यमिक शिक्षण धुळे येथील गरुड विद्यालय-  जून 1958 एसएससी परीक्षा पास-  1958 ते 1962 पुण्यातील एसपी महाविद्यालयातून बी एस सी उत्तीर्ण-  जून 1962 कोकणातील नरडवणे गावात शिक्षकाची नोकरी-  1964 ते 1980 पुण्यातील अशोक विद्यालयात शिक्षकाची नोकरी -  1972 :  सुगावा प्रकाशनाची सुरुवात ते आजतागायत सुरू-  1981 बीएड उत्तीर्ण-  1983 : उषा ताई वाघ याच्याशी आंतरजातीय विवाह: सरांच्या अनेक कामामध्ये ताईंचा पुढाकार-  1981 ते 86 पुणे विद्यापीठातील प्रौढ निरंतर शिक्षण विभागात रीडर म्हणून काम केले-  1986 पुणे विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा-  1964-1980 या काळात वडारवाडीत बालवाडी सुरू केली. सर्वेषा सेवा संघामार्फत देवदासींच्या मुला मुलींसाठी पहिले वसतिगृह सुरू केले. राष्ट्र सेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे एक वर्ष अध्यक्ष.-  1972 समता शिक्षण संस्थेची स्थापना या संस्थेमार्फत महिलाश्रम वसतिगृह तळेगाव येथे सुरू केले. कस्तुरबा मुलींचे वस्तीग्रह तळेगाव ढमढेरे येथे सुरू केले. समता मुलांचे वस्तीगृह तळेगाव येथे सुरू केले. 1978 भटक्या विमुक्त जमातीच्या मुला-मुलींसाठी तळेगाव येथे आश्रम शाळा सुरू केली. 1989  मोराणे येथे भटक्या विमुक्त जमातीच्या मुला मुलींसाठी आश्रम शाळा सुरू केली.-  1994  मोराणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय सुरू केले. -  1996 सिद्धार्थ सहकारी बँकेच्या स्थापनेत पुढाकार, दोन वेळा चेअरमन. -  1974 पासून सुगावा मासिक सुरू केले.-  समाज प्रबोधन संस्था मासिकेचे पदाधिकारी.-  पीपल्स इंप्रुव्हमेंट ट्रस्टचे विश्वस्त.-  परिवर्तन मिश्र विवाह संस्थेची स्थापना.-  हुजूरपागा शिक्षण संस्थेत उषा ताई वाघ पदाधिकारी.

पुरस्कार --  69 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आळंदी येथे यशस्वी प्रकाशक म्हणून पुरस्कार.-  दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीचा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप.-  दलित मुक्तविद्यापीठ गुंटूर आंध्र प्रदेशचा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप.-  महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा समाज प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार.-  औरंगाबाद येथील संस्थेचा लोक कैवारी पुरस्कार.-  आंबेडकर इंटरनॅशनल मिशन कॅनडा यांचा सुगावा मासिकाला पुरस्कार.-  प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विपू भागवत पुरस्कार.-  चार्वाक नागरी पतसंस्था नाशिक यांचा शांताबाई दाणी पुरस्कार.-  समता प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे दिनकरराव जवळकर पुरस्कार-  दादासाहेब रुपवते फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कार-  पुणे विद्यापीठात आंबेडकर अध्यासनाच्या संचालक पदी नेमणूक.-  दया पवार स्मृती पुरस्कार.-  पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार.-  आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित अस्मिता पुरस्कार.

टॅग्स :Puneपुणेsocial workerसमाजसेवकPune universityपुणे विद्यापीठProfessorप्राध्यापक