शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

सेकंड इनिंगच्या वाटेवर ' सेवाभावी केंद्रां' चा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 11:51 IST

उतरत्या वयात माणसांना सहवासाची व आधाराची गरज असते...

ठळक मुद्देभविष्यातील काळाची गरज :  सामाजिक बांधिलकी जपण्याचा हेतू 

दीपक कुलकर्णी-  पुणे : नोकरीतून निवृत्त होऊनही त्यांची काही वर्षे उलटलेली असतात. तसेच आयुष्याच्या पूर्वार्धात कमाईतून केलेली बचत किंवा आता निवृत्तीवेतनामुळे आर्थिक संपन्नताही पदरी असतेच. आयुष्यातील मुलांची शिक्षणे, नोकरी, लग्नकार्य यांसारख्या जबाबदाऱ्यांतून मुक्त होत आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यांकडे त्यांची वाटचाल सुरु असते.. अशा वेळी जोडीदारापैकी कुणी एकाने जगाचा निरोप घेतलेला असतो. तर कधी कधी आजारपणात हतबल अवस्थेत दोघेही जगात असतात. रोजच्या धावपळीत मग ही मंडळी नकळतपणे दुर्लक्षित होऊन जातात. अशा वेळी शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांची सर्वतोपरी सेवासुश्रूषा करत जबाबदारी घेणाऱ्या  सेवाभावी केंद्रे उत्तम पर्याय ठरू पाहताहेत...शहरी भागातील ज्येष्ठ मंडळींविषयी अपुरी मनुष्ययंत्रणा, निराधारता, देश-विदेशात स्थलांतरित असलेल्या कौटुंबिक व्यक्तींमुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, पुणे शहर किंवा परिसरात अंदाजे शंभरच्यावर नोंदणीकृत 'ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र 'उपलब्ध आहे. या केंद्रांमध्ये निराधार लोकांसह पेइंग गेस्ट म्हणून आश्रय घेता येतो. तिथे अनेक लोक राहत असल्याने कौटुंबिक वातावरणासह, तुमच्या आहारविहार, आरोग्य यांसह विरंगुळ्याची विविध साधने यांची उत्तम सोय केलेली असते. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत असे सर्व काही अतिशय चोख पद्धतीने नियोजन केलेले असते. आभाळमाया संस्थेच्या डॉ. अपर्णा देशमुख म्हणाल्या, की उतरत्या वयात माणसांना सहवासाची व आधाराची गरज असते. त्याच वयात काही जणांच्या आयुष्यात एकांतवास येतो. त्यात शारीरिक समस्यांमुळे इमारतीमधून नित्याची चढ उतार शक्य होत नाही. सभोवताली आरोग्याची काळजी घेणारे आणि मानसिक आनंद देणारे सभोवताली नसल्याने या व्यक्ती चिडचिड्या होतात. त्यातून अनेक आजारांची निर्मिती होते. मात्र आभाळमायासारख्या संस्थांमध्ये अशा व्यक्तींची काळजी घेतली जाते........काही दिवसांपूर्वी मला एका दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात पायाला आणि हाताला जबर दुखापत झाली. जवळपास ३ ते ४ महिने मला डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली होती. अशा वेळी माझे जवळचे नातेवाईक पुण्यात नसल्याने काळजी घेण्यासाठी कुणीही मंडळी उपलब्ध होत नव्हती. मोलकरीण बाईला जास्तीचे पैसे देऊनसुद्धा राहिलेल्या वेळेत माझ्याकडे येत असे. त्यामुळे जेवण, नाश्ता, औषधे वेळेवर न मिळाल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. - एक पीडित वयस्कर महिला. ...........आम्ही नोकरीला असतानाच उतारवयातली आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. तसेच निवृत्तीवेतनपण मिळते आहे. पण आता माझ्यासह कुटुंबातील सगळ्या सदस्यांची सत्तरीकडे वाटचाल सुरु आहे. जोपर्यंत हातपायांची हालचाल व्यवस्थितपणे सुरु आहे तोपर्यंत आम्ही घरात राहू. पण जेव्हा वाटेल की आता हालचाल करणे शक्य नाही तेव्हा आनंदाने सेवा केंद्राचा पर्याय निवडण्यात अडचण नसेल. तेथील वातावरण जवळून अनुभवण्यासाठी विविध केंद्रांना आम्ही भेटी दिल्या आहेत. तिथलं वातावरण, घेतली जाणारी काळजी, आहार असं सारं काही उत्तम आहे.  - एक वयस्कर कुटुंब..........कायमस्वरूपी आणि पेइंग गेस्ट म्हणून आमच्या संस्थेत तुम्हाला राहता येते. खेळीमेळीच्या वातावरणात सर्वजण एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकमेकांच्या सुख दु:खाचे भागीदार होतो. प्रत्येकाच्या आरोग्याची नित्यनियमाने काळजी घेतली जाते. सध्या वयस्कर मंडळींसाठीच्या केअर टेकर संस्था निर्माण होणे ही काळाची गरज आहे. - नीलिमा धेंडे , निर्मल सेवा केंद्र, हडपसर. ...........

टॅग्स :PuneपुणेSenior Citizenज्येष्ठ नागरिकHealthआरोग्यFamilyपरिवार