शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ दादा खडीवाले यांचे पुण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:43 IST

ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ आणि सामाजिक कार्याला मुक्तहस्ताने मदत करणारे परशुराम यशवंत खडीवाले उर्फ दादा वैद्य खडीवाले यांचे वृद्धापकाळाने खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

ठळक मुद्देखडीवाले हे भारतीय हवाई दलातून सुमारे सतरा वर्षे नोकरी करून एप्रिल १९६८ साली झाले निवृत्त विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले, लिहिली आयुर्वेदावर आधारित पुस्तके

पुणे : ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ आणि सामाजिक कार्याला मुक्तहस्ताने मदत करणारे परशुराम यशवंत खडीवाले उर्फ वैद्य दादा खडीवाले यांचे वृद्धापकाळाने खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. परशुराम यशवंत खडीवाले यांचा जन्म २४ आॅक्टोबर १९३२ रोजी झाला. खडीवाले हे भारतीय हवाई दलातून सुमारे सतरा वर्षे नोकरी करून एप्रिल १९६८ साली निवृत्त झाले. त्यांच्या वडिलांनी मृत्यूपत्रात ‘परशुरामाने आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे. औषधी कारखान्याकडे लक्ष द्यावे’, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे निवृत्तीनंतर प. य. खडीवाले यांनी पुण्यातील अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पदवीचे शिक्षण संपादन केले. अभ्यासक्रम सुरु असतानाच त्यांनी हरी परशुराम औषधालय सुरू केले. १९७४ मध्ये वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून सर्वसामान्यांना आयुर्वेदाचे शिक्षण घेता यावे, या उद्देशाने गुरुकूल सुरु केले. ४० वर्षे त्यांनी हे गुरुकूल विनाशुल्क चालवले. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात त्यांनी कोणतेही मानधन न घेता १० वर्षे रसशास्त्र विषयाचे अध्यापन केले. दादा खडीवाले यांनी ॠषीतूल्य महर्षी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या नावाने १९७० साली पंचकर्म रुग्णालयाची स्थापना केली. वैद्यकीय संदर्भ ग्रंथालयासाठी त्यांनी वैद्य अप्पासाहेब शास्छी साठे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ग्रंथालय सुरु केले. वैद्य खडीवाले यांनी ३० वर्षे पुणे महानगरपालिकेच्या गाडीखाना येथील कोटणीस रुग्णालयामध्ये एडसग्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि उपचार सुरु केले. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २ एकर जागेत औषधी वनस्पतींचे उद्यानही उभारले आहे. खडीवाले यांना पुणे महानगरपालिका, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, नाशिक आरोग्य विद्यापीठ, पंढरपूर देवस्थान यांच्यातर्फे विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी आयुर्वेदावर आधारित पुस्तकेही लिहिली आहेत.

टॅग्स :Puneपुणे