शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पिळदार शरीरयष्टीसाठी इंजेक्शन विकणारा गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 20:37 IST

सदरचे इंजेक्शन हे सर्जरी केलेनंतर रक्तपुरवठा नियंत्रित करण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम केलंनंतर सुस्ती न येण्यासाठी केला जातो

बारामती : झटपट पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी रक्त पुरवठा नियंत्रित करणारी इंजेक्शन अवैध पद्धतीने जिममध्ये विकणाऱ्यास बारामती पोलिसांनी गजाआड केले आहे. बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदिप सुरेश सातव (रा. कसबा, बारामती) या आरोपीस याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. सातव हा जीम करणाऱ्या लोकांना शरीर पिळदार होते, असे सांगून इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे सापळा रचून सातव यास त्याची चारचाकी गाडीसह (एम.एच.०२ डी.झेड.७२८६) पकडून त्याची व गाडीची झडती घेतली असता एकूण २० इंजेक्शन बॉटल मिळून आले आहेत.

सदरचे इंजेक्शन हे सर्जरी केलेनंतर रक्तपुरवठा नियंत्रित करण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम केलंनंतर सुस्ती न येण्यासाठी केला जातो. सदरचे औषध हे शरीरावर दुष्परिणाम करणारे असलेचे औषध निरीक्षक यांनी सांगितले आहे. सदरची औषधे ही कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली जात नसून ते बारामतीमधील जिमला विकले जात होती. पोलिसांनी तात्काळ औषध निरीक्षक यांना बोलावून सदर औषधे ही पोलीस व औषध निरीक्षक प्रशासनाने जप्त केली आहेत.

तरुण पिढीमध्ये पिळदार शरीरयष्टी बनवण्याचे वेड वाढलेले आहे. त्यासाठी काहीही करावयाची तरुणवर्गाची तयारी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट घेणे, काही इंजेक्शन घेणे यासारखे प्रकार केले जात आहेत. परंतु त्याचा दुष्परिणाम हा शरीरावर होत असतो. शरीराची खूप मोठया प्रमाणावर हानी होत आहे. मध्यंतरी काही बॉडीबिल्डर लोकाचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचे लोन आता ग्रामीण भागातसुद्धा पसरत आहे. सदरची कारवाई ही अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, गणेश पाटील, युवराज घोडके, संजय जगदाळे पोहवा रामचंद्र अभिजित कांबळे, दशरथ कोळेकर, अजित राउत, दशरथ इंगोले, सचिन कोकणे, मनोज पवार यांनी केली आहे.

आरोपी सातव याच्याकडून कडून २६८ रुपये प्रमाणे २० बॉटल्स किंमत अंदाजे ५,३६० रुपये तसेच 9 लाख किंमतीची चारचाकी असा एकूण ९ लाख ३५,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सदर औषध कोठून आणली व अजून कोणाकोणाली आहे याचा पुढील तपास सहायक पोलिस निरक्षक गणेश पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीDrugsअमली पदार्थbodybuildingशरीरसौष्ठवCrime Newsगुन्हेगारी