शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी तीन कंपन्यांची निवड :  किरण गित्ते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 8:01 PM

पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३.२ किलोमीटर मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप-पीपीपी) करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसर्वात कमी बोली लावणाऱ्याला मिळणार मेट्रोचे पूर्ण कामरिंगरोडच्या कामांना अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यतामेट्रोसाठी स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर पहिला टप्पातील पीएमआरडीएच्या मेट्रोच्या कामासाठी तीन कंपन्यांची निवड करण्यात आली. सिमेन्स, आयएफएल आणि आयआरबी या तीन कपन्यांपैैकी सर्वात कमी भाव (रेट) लावणाऱ्या कंपनीला २३.२ किलोमीटरच्या मेट्रोचे पूर्ण काम देण्यात येणार आहे, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.हिंजवडी ते शिवाजीनगर पहिला टप्पातील मेट्रोच्या कामासाठी येत्या महिन्याभरात वरील तीनपैैकी एक कंपनीची निवड करून,  त्यानंतर प्रत्यक्ष वर्क आॅर्डर काढण्यात येणार आहे.  पुढील दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार असल्याचे किरण गित्ते यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३.२ किलोमीटर मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप-पीपीपी) करण्यात येत आहे. हे काम प्रामुख्याने पीएमआरडीए आणि महामेट्रो कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरची मेट्रो दुसऱ्या टप्प्यात हडपसर (शेवाळवाडी) पर्यंत नेण्यात येणार आहे. या मार्गाच्या मेट्रोसाठी स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनला करण्यात येत आहे. तसेच या मार्गासाठी नेमका किती खर्च येणार आहे याचे दरपत्रक मागवले आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर पहिला टप्पातील काम झाल्यावर ही मेट्रो पुढे शिवाजीनगर ते हडपसरपर्यंत नेल्यास रोज शहराच्या वेगवेगळ्या भागात कामानिमित्त प्रवास करणाऱ्या या परिसरातील हजारो नागरिकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या पहिल्या टप्पातील २३ कि.मी.च्या मेट्रोच्या डीपीआरची सुरूवात २०१४-१५ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर २०१६-१७ मध्ये त्याला गती मिळाली. तो वेळ वाचण्यासाठी प्रस्तावित शिवाजीनगर ते हडपसर (शेवाळवाडी) या १२ किमी.च्या मेट्रो मार्गिकेची देखील उभारणी सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) तत्त्वावर केली जाणार आहे. त्यासाठी दिल्ली मेट्रो रेल  कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) संचालकांना पत्र पाठवून डीपीआरचे दरपत्रक मागविले आहे. त्यानंतर या मार्गिकेच्या कामाला गती मिळेल. ..................... रिंगरोडबाबत आज दिल्लीत बैठकवर्तुळकार रिंगरोडसाठी पहिल्या टप्प्यात ३३ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येत आहे. यासाठी १७ किलोमीटरची जागा ताब्यात आली आहे. तर ६ किलोमीटरची जागा टीडीआरमधून मिळणार आहे. उर्वरित १० किलोमीटरच्या जागा भूसंपादनाचे काम सुरू आहे. तसेच रिंगरोडच्या कामासाठी मोठा निधी लागणार आहे. त्याबाबत मंगळवारी दिल्ली येथे केंद्रीय सचिवालय आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) संचालकांबरोबर  बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत रिंगरोडच्या कामांना अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्ते