शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

"विद्राेह दाबता येणार नाही", पुणे विद्यापीठातील ‘रॅप’ प्रकरणांत डाॅ. जितेंद्र आव्हाडांची उडी

By प्रशांत बिडवे | Updated: April 14, 2023 18:03 IST

तलवार, पिस्तूल आणि मद्याची बाटलीसह रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी पाेलिसांनी रॅप बनविणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतले

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर तसेच सभागृहात अश्लील शिव्या देत तसेच तलवार, पिस्तूल आणि मद्याची बाटलीसह रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी शुक्रवारी पाेलिसांनी रॅप बनविणाऱ्यां तरूणांना ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रकरणात आता राष्ट्रवादीचे आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. ‘ तरूणांना बेकायदेशीररीत्या चाैकशीसाठी पाेलीस ठाण्यात बसवायचे आणि काहीही चूक नसताना गुन्हे दाखल करायचे याला काय अर्थ आहे? तुम्हाला विद्राेह दाबता येणार नाही’ आशा स्वरूपाचे व्टिट त्यांनी केले आहे.    

डाॅ. आव्हाड यांनी केलेल्या व्टिट मध्ये ते म्हणाले, रॅपर तरुणाला चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले आहे. मला याबाबत माहिती मिळताच मी रॅपर ला फोन केला.  त्याने समोर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला माझा फोन आहे असं सांगितले. पोलीस कर्मचाऱ्याने उद्धटपणाने मला बोलायचे नाही असे उत्तर दिले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर मला काढून दे असे मी त्याला सांगितले असता  तेथील पोलीस कर्मचारी म्हणाला की माझे वरिष्ठ अधिकारी मोकळे नाहीत ते काही कोणाशी बोलणार नाहीत. मी त्याला म्हटलं फोन खाली ठेवून दे.’

           ‘एकतर बेकायदेशीररित्या पोलीस ठाण्याला बसवायचे, काहीही चुकी नसताना गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी फोन केला तर जा फोन घेत नाही जा असं उद्धटपणे उत्तर द्यायचे ह्याला काय म्हणायचे? रॅपर हा बौद्ध समाजातील मुलगा असून आंबेडकरी चळवळीत काम करतो.’  असेही आव्हाडांनी व्टिटमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, ‘ चाेर आले’  हे रॅप गाणे तयार करून ते समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या रॅपरवर गुन्हे दाखल झाले असता  जितेंद्र आव्हाडांनी त्यांची पाठराखण केली हाेती.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडTwitterट्विटरPune universityपुणे विद्यापीठ