शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

Video : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये तुफान राडा; सुरक्षारक्षक आणि आरोग्य कर्मचारी भिडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 12:55 PM

जम्बो कोविड सेंटरमध्ये सुरक्षारक्षक व आरोग्य कर्मचारी यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

पुणे : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पुणे शहरातील शिवाजीनगर येथे तयार करण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलबाबत पहिल्या दिवसापासून वाद-विवाद सुरू झाले आहे ते आजतागायत थांबायला तयार नाही. पहिल्यांदा अपुऱ्या सुविधा, रुग्णांच्या उपचारात हेळसांड यावरून टीकेचे धनी झाल्यानंतर महापालिका व आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. मध्यंतरी कुठेतरी जम्बोचा गाडा रुळावर येतोय असे वाटत असतानाच अचानक महिला रुग्ण गायब झाल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले. तसेच पगार थकवल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाच्या जम्बोतील आंदोलनांनी तेथील समस्या संपल्या नसल्याची जाणीव करून दिली. याचदरम्यान गुरुवारी( दि. २४) जम्बो कोविड सेंटरमध्ये सुरक्षारक्षक व आरोग्य कर्मचारी यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये गुरुवारी आरोग्य कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्याचे काम सुरु होते. याचवेळी कर्मचारी व सुरक्षारक्षक यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.अद्याप तरी या प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आलेली नाही. परंतू, हाणामारीच्या घटनेमुळे जम्बो कोविडमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. 

कोरोना संकटाच्या काळात जीवाची बाजी लावून काम केल्यानंतर देखील महापालिका व राज्य सरकार आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा धारण केला आहे. व थकीत पगारासाठी दोन तीन वेळा आंदोलन करून देखील तसेच राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडून या कर्मचाऱ्यांबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र गुरुवारी थकीत पगाराचे वाटप सुरु असताना आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षारक्षक काही गोष्टीवरून वादावादी झाली.त्यानंतर याचे रूपांतर हाणामारी होऊन एकमेकांना भिडले.  

माणूस मेला तरी आमच्याकडे त्यांची माती करण्यासाठी पैसे नाही... माणूस मेला तरी आमच्याकडे त्यांची माती करण्यासाठी पैसे नाहीत. सप्टेंबरपासून पगार मिळालेले नाहीत. आमचा परिवार कसा चालणार? पगार मागितला तर आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली जाते. पालिकेने आमच्यासाठी दिलेला 12 हजारांचा बोनसही एजन्सीने लंपास केला. नर्सिंगचे काम करणा-या कर्मचा-यांचा मानसिक छळ करुन त्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा गंभीर आरोप अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला केला होता. 

सहा महिन्यांच्या करारावर नियुक्त करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना 35 हजार रुपये वेतन निश्चित करण्यात आले होते. परंतु, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निम्माच पगार देण्यात आला. तर, नोव्हेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरमहिन्याला अवघे दहा ते पंधरा हजार रुपये हातामध्ये टेकवले जात आहेत. पूर्ण पगाराची मागणी केल्यानंतर दमदाटी, शिविगाळ केली जात असून याबाबत आवाज उठविताच रुग्णालयाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर काढून टाकण्यात येते.  

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्या