शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

मुळा , मुठा आणि पवना नद्यांवरील अतिक्रमणांवर शोधसमितीचे शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 1:15 PM

नद्यांवरील सर्वच अतिक्रमणे गंभीर स्वरूपाची असल्याचे तसेच त्यामुळे नदीपात्राला धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट नमुद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल तयार : आता कारवाईची अपेक्षान्यायाधिकरणाने याची दखल घेत स्वतंत्र समितीमार्फत संबधित १२ अतिक्रमणांची प्रत्यक्ष पाहणीसर्वच अतिक्रमणे गंभीर स्वरूपाची असल्याचे तसेच त्यामुळे नदीपात्राला धोका निर्माणनदीचे पात्र अरूंद करण्यात या अतिक्रमणांचा मोठा वाटा

पुणे: मुळा, मुठा व पवना या तीन नद्यांवर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १२ ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांची पाहणी करण्याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नियुक्त केलेल्या समितीने शिक्कामोर्तब केले आहे. ही १२ अतिक्रमणे गंभीर स्वरूपाची असून त्यामुळेच या नद्यांच्या पुरपातळीत वाढ झाल्याचे समितीने अहवालात स्पष्ट म्हटले आहे. आता याबाबत दोन्ही महापालिका तसेच पीएमआरडीए ने कारवाई करणे अपेक्षित आहे.सारंग यादवाडकर, नरेंद्र चूघ, विवेक वेलणकर, दिलीप मोहिते यांनी या तिन्ही नद्यांमधील अतिक्रमणांबाबत याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी मोजकीच १२ गंभीर स्वरूपाची अतिक्रमणे उपग्रहाच्या साह्याने छायाचित्र काढून घेऊन याचिकेसमवेत सादर केली होती. त्यात काही ठिकाणी तर नदीचे पात्र वळवून भराव टाकून जमीन केल्याचे जुन्या व नव्या छायाचित्रांवरून ठळकपणे दिसत होते. काही ठिकाणी आश्रम वगैरे सुरू करून तिथे राबता ठेवण्यात आला होता. नदीचे पात्र अरूंद करण्यात या अतिक्रमणांचा मोठा वाटा असून ती तत्काळ काढून टाकण्याबाबत संबधित यंत्रणांना आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.न्यायाधिकरणाने याची दखल घेत स्वतंत्र समितीमार्फत संबधित १२ अतिक्रमणांची प्रत्यक्ष पाहणीअंती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.  या समितीने पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेच्या आयुक्तांसमवेत ही पाहणी केली. त्यांच्या अहवालात ही सर्वच अतिक्रमणे गंभीर स्वरूपाची असल्याचे तसेच त्यामुळे नदीपात्राला धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट नमुद करण्यात आले आहे. या अहवालातच अतिक्रमणे काढून टाकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकारची अतिक्रमणे शोधण्यासाठी यापुढे दोन्ही पालिका, पीएमआरडीए यांनी उपग्रह यंत्रणेचा वापर करावा अशीही सुचना अहवालात तयार करण्यात आली आहे.या अहवालानुसार आता दोन्ही महापालिका आयुक्त तसेच पीएमआरडीए चे प्रमुख यांनी ही सर्व अतिक्रमणे तत्काळ काढून टाकण्याची कारवाई सुरू करणे अपेक्षित आहे. याचिकाकर्त्यांनीही तशीच अपेक्षा व्यक्त केली आहे. नदीपात्रात भराव टाकून जमीन तयार करण्याचे प्रकार नदीत आता वाढू लागले आहेत. या जमिनीवर झोपडट्या टाकायच्या, त्यातून भाडे वसूल करायचे किंवा जागेची बोगस कागदपत्रे तयार करून तिथे इमारती बांधून त्यातील सदनिका विकायच्या असे होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे यादवाडकर यांनी सांगितले. हा अहवाल २६ सप्टेंबरला समितीच्या वतीने न्यायाधिकरणात सादर करण्यात येणार आहे अशी माहिती यादवाडकर यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेriverनदीEnchroachmentअतिक्रमणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका