शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पुनर्वसन झाल्याशिवाय शिक्के काढू देणार नाही; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 21:00 IST

भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनचा प्रश्न ३१ वर्षांपासून प्रलंबित

ठळक मुद्देभामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा इशारा : तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारापाचशेच्या वर धरणग्रस्त पॅकेजचे पैसे मिळण्याच्या रांगेत ६ महिन्यांपासून उभे

पाईट : भामा-आसखेड धरणग्रस्तांचे जोपर्यंत पुनर्वसन होत नोही, तोपर्यंत लाभक्षेत्रामध्ये संपादित केलेल्या जमिनीवरील शिक्के काढण्यास भामा-आसखेड धरणामध्ये बाधित झालेल्या धरणग्रस्त शेतकºयांनी विरोध दर्शविला आहे. तसा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे. भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनचा प्रश्न ३१ वर्षांपासून प्रलंबित आहे. यामध्ये पात्र १११ शेतकऱ्यांचे काहीअंशी पुनर्वसन झाले आहे; परंतु, कोर्टाने पुनर्वसनाचे आदेश दिलेल्या ५६४ पैकी अवघ्या ७० धरणग्रस्तांचे ७/१२ उतारे तयार झाले आहेत. यामुळे त्यांचा ताबा बाकी असून इतर ४९४ धरणग्रस्त जमीन मिळण्याचा प्रतीक्षेत आहेत.  शासनाने अपात्र ठरविलेल्या ३१५ धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पॅकेजचा मार्ग स्वीकारला. यामध्ये पाचशेच्या वर धरणग्रस्त पॅकेजचे पैसे मिळण्याच्या रांगेत ६ महिन्यांपासून उभे आहेत. अशा परिस्थितीत धरणग्रस्तच्यिंा सर्व मागण्या पूर्ण करण्याची भामा-आसखेड धरणग्रस्त सातत्याने मागणी करीत असून शासनाकडून मात्र कासव गतीने काम चालू आहे. या सर्व गोष्टी होत असल्या तरी, दरम्यान शासनाने पाण्याचे प्रयोजन बदलले. पाणी पुणे महापालिकेला विकले. त्यासाठीची सर्व कामे अती जलदगतीने सुरू आहेत. पाण्याचे प्रयोजन बदलले म्हणून लाभक्षेत्रातील शेतकरी जमिनीवरील शिक्के काढण्याची मागणी करीत आहेत. ‘आम्ही आमच्या जमिनी दिल्या. आम्ही बेघर, भूमिहीन झालो. आमचा विचार कोण करणार?’ असा सवाल धरणग्रस्तांनी विचारला आहे. पाण्याचे प्रयोजन बदलण्यामध्ये धरणग्रस्त शेतकºयांचे कोणतेही हित नसून प्रयोजन बदलले तर लाभक्षेत्र बदलून त्या भागात आमचे पुनर्वसन करा. काहीही करा; पण प्रथम आमचे पुनर्वसन करा, अशी धरणग्रस्त शेतकºयांची मागणी आहे. यासोबतच राहिलेल्या सर्व शेतकºयांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय जमिनीवरील शिक्के काढण्यास धरणग्रस्तांचा विरोध राहील............याबाबत भामा-आसखेड धरणग्रस्त आंदोलनातील प्रमुख सत्यवान नवले म्हणाले, ‘‘जोपर्यंत भामा-आसखेड धरणात बाधित झालेल्या शेवटच्या शेतकºयाचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत धरणग्रस्तांसाठी संपादित झालेल्या जमिनीवरील शिक्के काढण्यास धरणग्रस्तांचा तीव्र विरोध असेल. त्यासाठी शासनाने तत्काळ पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करावी.’’....................

धरणग्रस्तांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना जमिनीचा मोबदला रोख स्वरूपात पाहिजे, तर काहींना जमिनी हव्या आहेत. यामध्ये भामा-आसखेड धरणाच्या पाण्याचे प्रयोजन बदलले असून ज्या भागात पाणी मिळत नाही, तेथील जमिनी मागून त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल. चासकमान धरणातील लाभक्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र शिल्लक आहे. शिवाय, भामा-आसखेडच्या नदीपात्रातून शिरूर तालुक्याला जेथे पाणी मिळत आहे, अशा भागात प्रस्ताव भरून दिल्यास कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका घेऊन प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करू.-आमदार, दिलीप मोहिते 

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरी