शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

विश्वातील स्फोटांचे संदिग्ध वातावरण उघड करण्यात 'जीएमआरटी'च्या शास्त्रज्ञांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 2:03 PM

'जीएमआरटी' च्या शास्त्रजज्ञांच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश...

पुणे: जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांनी एक अत्यंत महत्वाचा शोध लावला आहे. सुधारित जीएमआरटी वापरुन त्यांनी वर्धित स्फोटांच्या नव्याने शोधलेल्या एटी २०१८ काऊ या स्त्रोताचे वातावरण अत्यंत संदिग्ध असल्याचे निश्चित केले आहे. हे स्त्रोत प्रचंड प्रमाणात उर्जा उत्सर्जित करतात तरीही की उर्जा अत्यंत वेगाने कमी होत असल्याचे यात सापडले आहे. यामुळे आणि त्यांच्या अत्यंत निळ्या रंगामुळे त्यांना एफओबीटी म्हणले केले आहे. या एफओबीटी मधून होणाऱ्या असमान उत्सर्जनाचा हा पहिलाच निरीक्षणाचा पुरावा शास्त्रज्ञांना सापडला आहे. 

याची उत्पती नेमकी कशी होते याचा शोध अजुनही लागायचा असला तरी मॅाडेल्स मध्ये मोठ्या प्रमाणात ताऱ्याचा स्फोट होणे वाढत जाणारा न्युट्रॉन तारा आणि दुसऱ्या ताऱ्याची टक्कर होणे आणि दोन पांढऱ्या वाढ न झालेल्या ताऱ्यांचे विलिनीकरण याचा समावेश आहे. 

हे एफओबीटी शोधणे अवघड आहे कारण ते आकाशात दिसतात आणि फार लवकर अदृश्य होतात. त्यातच रेडीओ लहरी उत्सर्जित करणारे एफओबीटी आणखी दुर्मिळ आहेत. 

२०१८ मध्ये शोध लागलेल्या २१५ दशलक्ष प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या एटी काउ २०१८ ने सामान्य सुपरनोव्हा पेक्षा जास्त प्रकाश दाखवला होता. त्यानंतर प्रा. पुनम चंद्रा यांनी आणि डॅा. ए जे नयना यांनी याच्या विस्तारित वातावरणाचे आणि उत्सर्जनाच्या क्षेत्राचे गुणधर्म निश्चित करण्यासाठी अपग्रेडेड जीएमआरटीचा उपयोग करुन रेडीओ निरिक्षणे नोंदवली. त्यानंतर या स्फोटाच्या आसपास असणारी अस्मान घेता शोधण्यात या निरिक्षणांचा उपयोग झाला. या स्फोटाभोवतीच्या सामग्रीची घनता उत्सर्जनाच्या क्षणापासून ०.१ प्रकाश वर्षीच्या आसपास तीव्रपणे घसरते. यातुन एटी काउ २०१८ चा पुर्वज तारा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात जास्त वेगाने वस्तूमान कमी करत होता हे दिसुन आले.

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञानResearchसंशोधन