विश्वातील स्फोटांचे संदिग्ध वातावरण उघड करण्यात 'जीएमआरटी'च्या शास्त्रज्ञांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 14:50 IST2021-04-30T14:03:26+5:302021-04-30T14:50:16+5:30
'जीएमआरटी' च्या शास्त्रजज्ञांच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश...

विश्वातील स्फोटांचे संदिग्ध वातावरण उघड करण्यात 'जीएमआरटी'च्या शास्त्रज्ञांना यश
पुणे: जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांनी एक अत्यंत महत्वाचा शोध लावला आहे. सुधारित जीएमआरटी वापरुन त्यांनी वर्धित स्फोटांच्या नव्याने शोधलेल्या एटी २०१८ काऊ या स्त्रोताचे वातावरण अत्यंत संदिग्ध असल्याचे निश्चित केले आहे. हे स्त्रोत प्रचंड प्रमाणात उर्जा उत्सर्जित करतात तरीही की उर्जा अत्यंत वेगाने कमी होत असल्याचे यात सापडले आहे. यामुळे आणि त्यांच्या अत्यंत निळ्या रंगामुळे त्यांना एफओबीटी म्हणले केले आहे. या एफओबीटी मधून होणाऱ्या असमान उत्सर्जनाचा हा पहिलाच निरीक्षणाचा पुरावा शास्त्रज्ञांना सापडला आहे.
याची उत्पती नेमकी कशी होते याचा शोध अजुनही लागायचा असला तरी मॅाडेल्स मध्ये मोठ्या प्रमाणात ताऱ्याचा स्फोट होणे वाढत जाणारा न्युट्रॉन तारा आणि दुसऱ्या ताऱ्याची टक्कर होणे आणि दोन पांढऱ्या वाढ न झालेल्या ताऱ्यांचे विलिनीकरण याचा समावेश आहे.
हे एफओबीटी शोधणे अवघड आहे कारण ते आकाशात दिसतात आणि फार लवकर अदृश्य होतात. त्यातच रेडीओ लहरी उत्सर्जित करणारे एफओबीटी आणखी दुर्मिळ आहेत.
२०१८ मध्ये शोध लागलेल्या २१५ दशलक्ष प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या एटी काउ २०१८ ने सामान्य सुपरनोव्हा पेक्षा जास्त प्रकाश दाखवला होता. त्यानंतर प्रा. पुनम चंद्रा यांनी आणि डॅा. ए जे नयना यांनी याच्या विस्तारित वातावरणाचे आणि उत्सर्जनाच्या क्षेत्राचे गुणधर्म निश्चित करण्यासाठी अपग्रेडेड जीएमआरटीचा उपयोग करुन रेडीओ निरिक्षणे नोंदवली. त्यानंतर या स्फोटाच्या आसपास असणारी अस्मान घेता शोधण्यात या निरिक्षणांचा उपयोग झाला. या स्फोटाभोवतीच्या सामग्रीची घनता उत्सर्जनाच्या क्षणापासून ०.१ प्रकाश वर्षीच्या आसपास तीव्रपणे घसरते. यातुन एटी काउ २०१८ चा पुर्वज तारा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात जास्त वेगाने वस्तूमान कमी करत होता हे दिसुन आले.