वारजे माळवाडीत विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 13:26 IST2018-08-18T13:25:51+5:302018-08-18T13:26:36+5:30
शनिवारी सकाळी साडेसहाला तो मित्रा बरोबर खेळत असताना पदपथावर बसला विजेचा धक्का बसला.

वारजे माळवाडीत विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू
पुणे: वारजे माळवाडी येथे शनिवारी ( दि. १८आॅगस्ट) सकाळी साडे सहाला मित्रांबरोबर खेळत पदपथावर असलेल्या विजेचा धक्का लागून या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. पृथ्वीराज विशाल चव्हाण असे मृत मुलाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे येथील साई कॉलनी विशाल हा हा रोझरी शाळेमध्ये सहावी वर्गात शिकत होता .शनिवारी सकाळी साडेसहाला तो मित्रा बरोबर खेळत असताना पदपथावर बसला विजेचा धक्का बसला. स्थानिक नागरिकांनी विशालला माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने बसविण्यात आलेल्या नवीन विद्युत पोलजवळ हा अपघात घडला.