शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सासवडमध्ये शाळेच्या बसला अपघात ;  ७ मुले व बसचा चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 20:13 IST

सासवड येथील ४ विद्यार्थ्यांना सोडवुन उर्वरीत १४ विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी स्कूल बस भिवडी येथे जात होती.

ठळक मुद्दे दैव बलवत्तर चिमुकल्यांचे वाचले प्राण

सासवड : सासवड शहरातील पुरंदर हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हिल टॉप इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बसला गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास आयशर टेम्पोने समोरासमोर धडक दिली. या अपघातात ७  शालेय मुले व बसचा चालक  जखमी झाला आहे. चांबळी येथिल हिल टॉप इंग्लिश मीडियम स्कूल चांबळी या शाळेची बस  ही १६ विद्यार्थी व दोन मदतनिस यांना घेवून म्हाडा कॉलनीतील विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी जात होती. यावेळी सासवड येथील ४ विद्यार्थ्यांना सोडवुन उर्वरीत १४ विद्यार्थ्यांना सोडण्यासाठीती   भिवडी येथे जात होती. दुपारी २ च्या सुमारास सासवड- आंबोडी रस्त्यावर पुरंदर हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर  वेगाने येणा-या आयशर टेम्पोने  शाळेच्या बसला  जोरदार धडक दिली.  जोराने धडक बसल्याने बस मधील विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर फेकली जाऊन  ७ विद्यार्थी जखमी झाले. बसमध्ये असणारे दोन  मदतनीसही किरकोळ  जखमी झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवीत हाणी झाली नाही. जखमींना पुरंदर हायस्कूल मधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तातडीने मदत केल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.   या अपघातात विराज शेंडगे (वय ५), मुग्धा गायकवाड (वय ५), श्रीतेज बडधे (वय ६), यश जरांडे (वय ११), ओम फडतरे (वय ६ ),अर्थव शेटे(वय ६),अराध्या चौधरी (वय ६), बसचालक चंद्रकांत रणपिसे (वय ५९)  अशी जखमींची नावे असून त्यांना  प्रथमोपचारानंतर  घरी सोडण्यात आले.———————————————— 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातSchoolशाळा