शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उत्पन्नात १०० कोटीची घट;अनावश्यक खर्चाला लावणार कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 00:03 IST

केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातही कपात होणार

ठळक मुद्देयंदा विद्यापीठाचे ५०० ते ५२५ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक सादर केले जाणार

पुणे: कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक कोंडी झाली असून व्यक्तिंसह विविध संस्थांच्या उत्पन्नातही मोठी घट झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही त्याला अपवाद नसून विद्यापीठाचे उत्पन्न तब्बल १०० ते १२५ कोटींनी घटणार आहे. परिणामी यंदा विद्यापीठाचे ५०० ते ५२५ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून नव्या बांधकांसह विविध अनावश्यक खर्चाला कात्री लावली जाणार आहे.विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा शुल्काच्या माध्यमातून विद्यापीठाला सुमारे १२० ते १३० कोटी रुपये मिळतात. तसेच बँकांमधील ठेवींच्या व्यापापोटी सुमारे ४० ते ४५ कोटी रुपये मिळतात. मात्र, कोरोनामुळे बँकेच्या व्याजदरात मोठी घट झाली आहे. तसेच विद्यापीठाला अलिकडच्या काळात परीक्षा शुल्कातून निधी मिळण्याची शक्यता नाही. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातही कपात होणार आहे. विद्यापीठाला मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याची सांगड घालण्यासाठी विद्यापीठाने अनावश्यक खर्च कमी करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या मोठी असल्यामुळे विद्यापीठाने विद्यापीठ फंडातून काही कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सुमारे काही कोटी रुपए खर्च होतो. त्यामुळे या पुढील काळात कंत्राटी कामगार नियुक्तीवरही निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने या पूर्वीच सध्या सुरू असलेली बांधकामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन बांधकाम करायचे नाही,असा निर्णय घेतला होता. परंतु, कोरोनामुळे आता कोणतेही नवीन बांधकाम केले जाणार नाही. तसेच विविध परिसंवाद, चर्चासत्र, प्रशासकीय कार्यक्रमांच्या आयोजनावरचा खर्चही कमी करण्यात येणार आहे.विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या व अधिसभेच्या एका बैठकीस सुमारे ७ ते १० लाख रुपये खर्च येतो. परंतु,ऑनलाईन पध्दतीने बैठक घेतल्यामुळे हा खर्च केवळ ५ हजार रूपर्यांपर्यंत येतो.त्याचप्रमाणे येत्या १५ जून रोजी सुध्दा अधिसभेची बैठक सुध्दा ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत राज्यपाल कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.या अधिसभेच्या बैठकीत अर्थसंकल्पास मंजूरी घेतली जाणार आहे,असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या