शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 'मोठा' निर्णय; 'त्या' विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 11:18 IST

ऑनलाईन परीक्षा देताना विविध तांत्रिक तक्रारींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागला होता...

पुणे : विद्यापीठाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा दि. १२ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. पण ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये लॉगिन न होणे, इंग्रजी-मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका न मिळणे, सर्व्हर हँग होणे, आकृत्या व सूत्रे न दिसणे, टेस्ट सबमिट न होणे, चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळणे, दोन परीक्षा एकाच दिवशी येणे, विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा आदी तक्रारी याांचा समावेश आहेत. या तक्रारींबाबत २८ ऑक्टोबर रोजी परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये अडचणींमुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा दि. ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान घेण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. 

विविध अडचणींमुळे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. या परीक्षा ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान केवळ ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. परीक्षेबाबत तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

या परीक्षा केवळ ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणार आहेत. विना अडथळा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा देता येणार नाही. ऑफलाईन पध्दतीने परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन पुनर्परीक्षा देता येईल. त्यांच्याकडे संगणक, लॅपटॉप आदी सुविधा नसल्यास महाविद्यालयांनी या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सुचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. ---------------तक्रारी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या  ई-मेल आयडीवर पुनर्परीक्षेबाबतची माहिती दि. २ नोव्हेंबरपर्यंत पाठविली जाईल. तक्रार केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी विद्यापीठाचा ई-मेल मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ३ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.--------------

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीPune universityपुणे विद्यापीठcorona virusकोरोना वायरस बातम्याonlineऑनलाइन