शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी उडवणार विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 06:00 IST

विद्यापीठाने अमेरिका,दक्षिण अफ्रिका आणि जर्मनी या देशातील एव्हीएशन क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित प्रशिक्षण संस्थांबरोबर करार केले..

ठळक मुद्देबीटेक एव्हिएशन अभ्यासक्रमास मान्यता : केवळ २० विद्यार्थ्यांनाच मिळणार प्रवेशबारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे ‘बी.टेक. एव्हीएशन’ हा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यापीठात या अभ्यासक्रमास प्रवेश घेवून विमान उडविण्याचे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. केवळ २० विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे, असे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अदित्य अभ्यंकर यांनी सांगितले. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे काही वर्षांपूर्वी एम.टेक. एव्हिएशन अभ्यासक्रम सुरू केला. त्यास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत आहे. विद्यापीठाकडून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना एम.टेक एव्हिएशन अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात आहे. मात्र, आता विज्ञान शाखेतून ‘पीसीएम ग्रुप’ घेवून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बी.टेक.एव्हीएशन या अभ्यासक्रमास प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकतीच या अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे.डॉ. अदित्य अभ्यंकर म्हणाले, विद्यापीठाने अमेरिका,दक्षिण अफ्रिका आणि जर्मनी या देशातील एव्हीएशन क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित प्रशिक्षण संस्थांबरोबर करार केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करताना दीड वर्ष प्रत्यक्ष विमान उडविण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. तर अडीच वर्षे विद्यापीठाच्या आवारात एव्हिएशन क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क ४० ते ८० लाख रुपयांच्या दरम्यान असून त्यात विमान उडविण्याच्या प्रशिक्षण शुल्काचा समावेश केला आहे.विद्यापीठातर्फे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी ५१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील २० विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द केली असून त्यांची मुलाखत घेवून त्यातील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जातील. देशात प्रथमच बारावीनंतर चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणाबरोबरच अभियांत्रिकी पदवी मिळणार आहे,असेही अभ्यंकर यांनी स्पष्ट केले.-विद्यापीठातर्फे बी.टेक.एव्हिएशन अभ्यासक्रम सुरू केला जात असून ‘पायलट’ होण्याची तीव्रइच्छा असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जाईल. डॉलर व युरोचे मुल्य कमी अधिक होत असते. त्यामुळे या अभ्यासक्रमाचे शुल्क ४० ते ८० लाख रुपयांच्या दरम्यान असेल.हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पायलटच नाही तर विमान कंपन्यांमधील इतरही पदांवर काम करण्याची संधी प्राप्त होईल. - डॉ.अदित्य अभ्यंकर,विभाग प्रमुख,तंत्रज्ञान विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीairplaneविमान