शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना एप्रिल महिना उजाडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 18:49 IST

परीक्षा जुन्या एजन्सीच्या सहकार्याने घेणार की नवीन एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणार याबाबत एकमत नाही.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा येत्या 15 मार्चपासून सुरू केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, परीक्षा जुन्या एजन्सीच्या सहकार्याने घेणार की नवीन एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणार याबाबत अद्याप विद्यापीठाचे एकमत झाले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यास एप्रिल उजाडणार आहे. 

कोरोनामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला.मात्र,विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने दिलेल्या मार्गदर्शनावर 15 मार्चपासून परीक्षा घेण्याचे जाहीर केले. विद्यापीठाने यापूर्वी परीक्षेसाठी निवडलेल्या एजन्सीबरोबर एक वर्षाचा करार केला. त्यामुळे परीक्षा विभागाने जुन्या एजन्सीबरोबर पुढील परीक्षेसंदर्भात नियोजन सुरू केले. मात्र, जुन्या एजन्सीला काम देता येणार नाही. नवीन एजन्सी निवडण्याची पक्रिया पूर्ण करावी लागेल,अशी चर्चा नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाली. त्यामुळे 15 मार्चपासून परीक्षा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, विद्यापीठाकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाने हा संभ्रम दूर करावा,अशी मागणी अधिसभा सदस्य व विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.  -----------------------------परीक्षेचे काम कोणत्या एजन्सीला द्यावे याबाबत अद्याप परचेस कमिटीमध्ये निर्णय झालेला नाही.एजन्सी निवडीची प्रक्रिया नियमाप्रमाणे करावी लागणार आहे.त्यामुळे विद्यापीठाला एजन्सी निवडीसाठी नव्याने निविदा काढावी लागेल.- राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ----------------- विद्यापीठाला जुन्या एजन्सीला परीक्षेचे काम देता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यापीठाने खर्च करून स्थापन केलेल्या दोन कंपन्यांना परीक्षेचे काम द्यावे. जर या कंपन्यांना परीक्षा घेण्यास सक्षम नसतील तर त्यांच्या उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, परीक्षा लवकर घेण्यासाठी लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.-  संतोष ढोरे,अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ----------------------

विद्यापीठाचा परीक्षेच्या निर्णयात कायमच गोंधळ आहे. परीक्षा ऑनलाईन आणि व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात याव्यात. पूर्वीप्रमाणे परीक्षेत गोंधळ होणार यासाठी यावेळी निविदा प्रक्रिया राबवून योग्य कंपनीला परीक्षेचे काम द्यावे. तसेच परीक्षेत व निकालात गोंधळ झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल याची विद्यापीठाने नोंद घ्यावी.- कमलाकर शेटे,उपाध्यक्ष,युक्रांद, पुणे शहर. ---------------------------- 

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीonlineऑनलाइन