SPPU | पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा आजपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 14:32 IST2022-07-21T14:31:40+5:302022-07-21T14:32:55+5:30

भारतातील २२ केंद्रांवर ही पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठीची ही ऑनलाइन परीक्षा...

savitribai phule Pune University entrance exam starts today | SPPU | पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा आजपासून सुरू

SPPU | पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा आजपासून सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ही परीक्षा गुरुवार (दि. २१) पासून ऑनलाइन होत आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण २१ हजार ६७० अर्ज आले आहेत.

राज्यासह भारतातील २२ केंद्रांवर ही पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठीची ही ऑनलाइन परीक्षा दि. २१ ते २४ जुलै दरम्यान विविध केंद्रावर होणार आहे. ही परीक्षा शंभर गुणांची असून, यात वस्तुनिष्ठ बहुपर्याय असतील. ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहेत, त्यांची प्रवेश परीक्षा होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून त्या विभागाने कळवले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची ही प्रवेश प्रक्रिया होत असून, याअंतर्गत पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा एकूण १७४ अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. त्यामधील ९३ अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा दि. २१ ते २४ जुलै दरम्यान होणार आहे. या १७४ अभ्यासक्रमाच्या एकूण ७ हजार ८५० जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी केंद्रांवर जात ही परीक्षा द्यायची असून, यासंबंधी सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचे विद्यापीठ प्रवेश विभागाकडून सांगण्यात आले आहे.

प्रवेश परीक्षेसाठी आलेले अर्ज

पदवी                         ७४८

पदव्युत्तर पदवी     १८२७०

पदविका          ७२५

पदव्युत्तर पदविका    ९०९

प्रमाणपत्र अभ्यासक्रम १०१८

Read in English

Web Title: savitribai phule Pune University entrance exam starts today