शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

'पुरंदर वाचवा, विमानतळ थांबवा', बाधित गावांतील ग्रामस्थांचे राष्ट्रपतींना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:36 IST

पुरंदर तालुक्यातील सामान्य शेतकरी, महिला, तरुण व नागरिक आमच्या वेदना आणि व्यथा थेट आपल्यासमोर मांडत आहोत

सासवड : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला होणारा विरोध हा तीव्र स्वरूप धारण करत असताना दिसत आहे. विमानतळ बाधितांनी आता राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांना विमानतळ थांबवा, असे साकडे घातले आहे. विमानतळ बाधित पारगाव मेमाने गावातील बाधित शेतकरी यांनी पुरंदर विमानतळ बाधितांच्या मागण्या मांडणारे पत्र राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांना पाठवले आहे. तसेच, अशाच पद्धतीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांना हे पत्र पाठविले असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पुरंदर विमानतळ विरोधातील शेतकऱ्यांनी म्हटले, महोदया, आपण भारतीय राज्यघटनेच्या रक्षणकर्ता असून, देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान आहात, म्हणूनच आम्ही पुरंदर तालुक्यातील सामान्य शेतकरी, महिला, तरुण व नागरिक आमच्या वेदना आणि व्यथा थेट आपल्यासमोर मांडत आहोत. गेल्या १० वर्षांपासून आम्ही शांततामय आणि घटनात्मक मार्गाने पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा सातत्याने विरोध करत आहोत. ५ फेब्रुवारी २०१८ रोजी आम्हा शेतकऱ्यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना इच्छा मृत्यूची परवानगी द्या, अशा तीव्र भावना व्यक्त करणारे पत्र पाठवले होते; परंतु आजपर्यंत त्याला कुठलेही उत्तर मिळाले नाही. आजही आम्ही भारतीय नागरिक असूनही आपल्या देशातच आमच्या न्यायासाठी केलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

आमची ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही. आमची ही लढाई आहे, आमच्या भूमी अधिकारांची, लोकशाहीच्या रक्षणाची आणि भारतीय राज्यघटनेतील वचनांच्या सन्मानाची. राज्यघटना वाचवा, लोकशाही वाचवा, पुरंदर वाचवा, अशी मागणी करत आपण एक जबाबदार घटनात्मक पालक म्हणून या न्याय युद्धात हस्तक्षेप करावा, अशी नम्र विनंती करणारे पत्र हे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित पारगाव गावचे शेतकरी युवराज मेमाणे यांनी सात बाधित गावांच्या तर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले आहे.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळFarmerशेतकरीDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार