शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुरात अडकलेल्या सख्ख्या भावांना पोलीस व तरूणांच्या प्रसंगावधानामुळे मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 15:13 IST

बारामतीतील घटना; सुमारे एक तास चालले थरारनाट्य..

ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे तसेच नाझरे धारणातून सोडलेल्या पाण्यामुळे कऱ्हा नदी दुथडी भरून वाहतेय

बारामती : बारामती शहरात कऱ्हा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या सख्ख्या भावांना पोलीस, युवकांच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले. सुमारे एक तास हे थरारनाट्य सुरू होते. सोमवारी (दि. १२) दुपारी एकच्या दरम्यान हा प्रकार घडला.बारामती शहरातील आप्पासाहेब पवार मार्ग लागत असणाऱ्या लहान पुलाजवळ पाण्यात तोल जाऊन पडलेल्या दोन युवकांना पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. परिणामी बारामती तालुक्याच्या जिरायती भागात देखील मुसळधार पावसामुळे तसेच नाझरे धारणातून सोडलेल्या पाण्यामुळे कऱ्हा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने कऱ्हा नदीच्या पाण्यामध्ये उतरण्याचे कोणी धाडस करत नाही. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १२) एकच्या सुमारास कपडे धुण्यासाठी आलेल्या ऋतू हिम्मत भोसले (वय १८) व बंटी भोसले  (वय १६) हे दोन भाऊ कपडे धुत असताना त्यांचा तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात पडले. मागील वर्षी पुरात वाहून गेलेल्या लहान पुलाला पकडले मात्र हा पूल वाहून गलेल्याने येथे असणाऱ्या सिमेंटच्या पाईप मध्ये अडकून पडले.  वरून पाण्याच्या प्रचंड दबावाने त्या दोघांना पाण्यातुन बाहेर येता येत नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस व स्थानिक तरुण मदतीला धावले व जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने बंटी भोसलेला बाहेर काढण्यात यश आले. तर ऋतू मात्र पाण्यातील झुडपात अडकवून बसला होता व मदतीची याचना करत होता.

पोलिसानी तेथे असणाऱ्या साडीच्या मदतीने किशोर लोखंडे याने सावधपणे ऋतूला बांधत विरुद्ध दिशेला ओढले. याचवेळी पोलिसानी या तरुणाला वरती ओढून त्याचे प्राण वाचवले घडलेला प्रकार लक्षात आल्यावर सहाय्यक पोलीस अधिकारी पद्मराज गंपले ,सहाय्यक पोलीस अधिकारी योगेश शेलार,पोपट नाळे ,राजभाऊ गायकवाड ,तुषार चव्हाण ,बापू इंगुले,होमगार्ड पी.खांमगळ,बारामती नगर परिषदेचे अधिकारी संजय प्रभुणे,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जाधव,किशोर लोखंडे या तरुणांनी अथक प्रयत्नांनी दोघांचे प्राण वाचवले शहरात सर्वत्र कौतुक होते आहे.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीriverनदीWaterपाणीPoliceपोलिस