शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Satish Wagh Case : सतीश वाघ खूनप्रकरणी बायकोच मास्टरमाइंड; मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध अन् असा रचला डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:57 IST

सतीश वाघ बघणारे सर्व आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्या हातात पाहिजे होते. सतीश तिला खर्चासाठी पैसेदेखील देत नव्हता.

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या खुनाचा कट मामीने घरातच रचल्याचे स्पष्ट झाले आहे. अनैतिक संबंधासह नवऱ्याचा संपूर्ण आर्थिक व्यवहार आपल्याच ताब्यात असावा, या उद्देशाने ५ लाखांची सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेतील मास्टरमाइंड बायकोच असून, तिने प्रियकराच्या मदतीने मारेकऱ्यांना ५ लाख रुपये देऊन पतीचा खून घडवून आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मोहिनी सतीश वाघ (४८, रा. ब्लूबेरी हॉटेलजवळ, फुरसुंगी फाटा, फुरसुंगी), असे अटक पत्नीचे नाव आहे. सतीश तात्याबा वाघ (५८, रा. फुरसुंगी, सासवड रस्ता), असे खून केलेल्याचे नाव असून, पोलिसांनी यापूर्वीच तिचा प्रियकर अक्षय हरीश जावळकर, पवन श्यामकुमार शर्मा (३०, रा. शांतीनगर, धुळे), विकास शिंदे, नवनाथ अर्जुन गुरसाळे (३२, रा. अनुसया पार्क, वाघोली) आणि आतिश जाधव या आरोपींना अटक केली आहे.

 

आरोपी अक्षय हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू होता. त्यावेळी मोहिनी सोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. याची कुणकुण सतीशला लागली होती. त्यामुळे मोहिनीने नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव रचला. तिने अक्षयला नवरा सतीशचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी ५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयकडे दिले. त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीशला मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती. त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला कटात सहभागी करून घेतले.याबदल्यात अक्षयने आरोपीला आगाऊ दीड लाख रुपये दिले. त्यानंतर सतीश वाघ हे ९ डिसेंबर रोजी पहाटे मॉर्निंग वॉक करत असताना, पाच जणांनी त्यांचे अपहरण करून सासवडच्या दिशेने नेले. अवघ्या १५ मिनिटांमध्ये मारेकऱ्यांनी गाडीतच वाघ यांच्यावर ७२ वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात टाकून दिला. गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींना अटक केली. 

मोहिनीला आर्थिक व्यवहार पाहिजे होते हातात..सतीश वाघ बघणारे सर्व आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्या हातात पाहिजे होते. सतीश तिला खर्चासाठी पैसेदेखील देत नव्हता. यामुळे सुरुवातीला मोहिनीने अक्षयला पती सतीशला गंभीर जखमी करून ते अंथरुणाला खिळून पडले पाहिजे, असे काहीतरी कर, असे सांगितले होते. तसेच मोहिनीने अक्षयला तू जर असे केले नाहीस तर आपले लफडे मी माझ्या नवऱ्याला सांगिन, मग तो तुझी काय हालत करेल हे बघ, अशी धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे अक्षय दबावाखाली होता. ही बाब त्याने पवनला सांगितली. त्यानंतर आरोपींनी संगनमताने सतीश वाघ यांचे अपहरण करत खून केला. आरोपी अक्षय याने पोलिस तपासात मोहिनीनेच खुनाची सुपारी दिल्याचे सांगितले होते. पोलिसांनी याप्रकरणी तिची चौकशी करत, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळवली. मोहिनीचा या कटातील सहभाग स्पष्ट होताच बुधवारी दुपारी पोलिसांनी तिला अटक केली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस