पुणे : सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकाला अटक केली आहे. खून झाल्याच्या घटनेपासून ताे पोलिसांना गुंगारा देत होता. आतिश जाधव असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जाधव याला धाराशिव येथून गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. खून झाल्यापासून पोलिस जाधव याचा शोध घेत होते. सुरुवातीला पवन शर्मा (रा. धुळे) आणि नवनाथ गुरळ (रा. फुरसुंगी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. आता जाधव याला अटक केली आहे.सतीश वाघ हे विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत. फुरसुंगी परिसरात मॉर्निंक वॉक करीत असताना ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचे अपहरण करण्यात आले. दरम्यान, हल्लेखाेरांनी वाघ किती वाजता व्यायामासाठी घराबाहेर पडतात, त्यांच्यासोबत कोण-कोण असते, परिसरात सीसीटीव्ही आहेत का नाही, अपहरणानंतर त्यांना कुठे न्यायचे, यासाठी विनाक्रमांकाची कार वापरण्याची अशी पुरेपूर दक्षता घेत पाच जणांनी वाघ यांचे कारमधून अपहरण करत खून केला होता.
Satish Wagh Case: सतीश वाघ खूनप्रकरणी आणखी एकाला अटक
By नितीश गोवंडे | Updated: December 24, 2024 17:44 IST