Satish Magar has been elected as the National President of CREDAI and Shantilal Kataria as the Vice President | 'क्रेडाई' च्या राष्ट्रीय चेअरमनपदी सतीश मगर तर उपाध्यक्षपदी शांतीलाल कटारिया यांची निवड

'क्रेडाई' च्या राष्ट्रीय चेअरमनपदी सतीश मगर तर उपाध्यक्षपदी शांतीलाल कटारिया यांची निवड

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतीश मगर क्रेडाईच्या राष्ट्रीय चेअरमन तर पुण्यातील शांतीलाल कटारिया यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

क्रेडाई अर्थात कॉफिडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. ही निवड २०२१ ते २०२३ या दोन वर्षांसाठी असणार आहे. 

क्रेडाई पुणे मेट्रो आणि महाराष्ट्रचे बरेचसे पदाधिकारी आता क्रेडाई राष्ट्रीयसाठी काम करणार आहेत. 

क्रेडाई पुणे मेट्रोचे काही सदस्य आणि पदाधिकारी आता राष्ट्रीय स्तरावरील काही समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. यामध्ये सुहास मर्चंट (आकडेवारी आणि मानके), जे. पी. श्रॉफ (कौशल्य विकास) मनीष कनेरिया (पर्यावरण), आय. पी. इनामदार (कायदेशीर बाबी) या समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील तर कपिल गांधी (जनसंपर्क आणि प्रसिद्धी) समितीचे सह-अध्यक्ष म्हणून काम करतील. 

शांतीलाल कटारिया म्हणाले, "क्रेडाई पुणे मेट्रो आणि महाराष्ट्रचे पदाधिकारी इतक्या मोठ्या प्रमाणात यापुढे क्रेडाई  राष्ट्रीय साठी काम करणार आहेत ही महाराष्ट्रसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या याआधीच्या जवाबदाऱ्या अत्यंत चोखपणे पार पाडल्या आहेत ही बाब अधोरेखित होते. मला खात्री आहे की यापुढेही हे सर्व पदाधिकारी क्रेडाई  राष्ट्रीयसाठी काम करताना नवे मापदंड प्रस्थपित करतील." 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Satish Magar has been elected as the National President of CREDAI and Shantilal Kataria as the Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.