‘बीआरटी’च्या लग्नाला सतरा विघ्ने
By Admin | Updated: September 1, 2015 04:18 IST2015-09-01T04:18:44+5:302015-09-01T04:18:44+5:30
सांगवी-किवळे बीआरटीएस बस मार्ग... दुपारी एकची वेळ... राजकीय नेते आणि अधिकारी बसमध्ये बसलेले... अन् क्लच प्लेट तुटते अन् गाडी बंद पडते.

‘बीआरटी’च्या लग्नाला सतरा विघ्ने
पिंपरी : सांगवी-किवळे बीआरटीएस बस मार्ग... दुपारी एकची वेळ... राजकीय नेते आणि अधिकारी बसमध्ये बसलेले... अन् क्लच प्लेट तुटते अन् गाडी बंद पडते. अधिकारी दुसरी गाडी मागवितात. तीपण कॅरिडोअरला घासते आणि काही मिनिटांचा प्रवास तासांवर जातो. वरकरणी ही चित्रपटाची कहाणी वाटेल. पण, हा बीआरटीएस बस चाचणीचा प्रवास आहे.
‘बीआरटीएस’ कधी सुरू होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, पाहणी करण्यातच वेळ जात असून, प्रत्यक्षात बस कधी धावणार, असा सवाल शहरवासीय उपस्थित करीत आहेत. दरम्यान, महापौर शकुंतला धराडे, स्थायी समितीचे सभापती अतुल शिताळे, आयुक्त राजीव जाधव, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेविका सुषमा तनपुरे, ‘पीएमपीएमएल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरा शिंदेकर यांच्यासह महापालिका व ‘पीएमपीएमएल’चे अधिकारी
यांच्या उपस्थितीत सोमवारी
पाहणी दौरा झाला. (प्रतिनिधी)