शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सासवडचे पदपथ होणार प्रकाशमान

By admin | Updated: June 6, 2015 22:14 IST

नगर परिषदेतर्फे पदपथांवर एलईडी दिवे बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सर्व पदपथ रात्री प्रकाशमान होणार आहे. याबरोबरच विजेचीही बचत होणार आहे.

सासवड : नगर परिषदेतर्फे पदपथांवर एलईडी दिवे बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सर्व पदपथ रात्री प्रकाशमान होणार आहे. याबरोबरच विजेचीही बचत होणार आहे. हिवरे रोड चौक येथे नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या हस्ते कामाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेंतर्गत अनुदानातून हे काम करण्यात येत आहे. सासवड शहरातील एकूण १५४ खांबांवर २३७ एलईडी दिवे बसविण्यात येतील. यामुळे ८० टक्के विजेची बचत होणार आहे. शहरातील हिवरे रोड ते सोपानदेव मंदिर, तहसील कचेरी ते भैरवनाथ आखाडा, कमलेश्वर घाट ते मामलेदार कचेरी, जेजुरी नाका ते कमलेश्वर घाट, नाचण दुकान ते हिवरे रोड, सोपाननगर पाण्याची टाकी ते नाचण दुकान, छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा ते नवप्रकाश चौक, पाणीपुरवठा केंद्र ते आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनासमोरील रस्ता, एसटी स्थानक ते पालखी तळ, वीर बाजी पासलकर शाळा परिसर (दळवी आळी) या ठिकाणी असणाऱ्या भूमिगत केबलवर असणाऱ्या खांबावरील दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्यास सुरुवात झाली आहे. या कामासाठी अंदाजे ५७ लाख ६३ हजार रुपये एवढा खर्च येणार आहे. एका महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. या वेळी नगरसेवक अजित जगताप, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, विद्युत विभाग प्रमुख प्रवीण जगताप, प्रकाश जगताप, नाना जगताप, दीपक जगताप, कैलास जगताप, बबन जगताप, नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक प्रमिला सरोदे, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, कर निरीक्षक रंजना दुगार्डे, लेखा अधिकारी किरण हेंद्रे, अनिल जगताप, पाणीपुरवठा अभियंता कळसकर यांसह सासवडचे नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)