शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी गावची स्वच्छता ; संध्याकाळी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 21:47 IST

साेरतापवाडीचे सरपंच सुदर्शन चाैधरी यांनी आपल्या लग्नाच्या दिवशी देखील स्वच्छता अभियानात सहभागी हाेऊन गावकऱ्यांसमाेर एक आदर्श निर्माण केला आहे.

पुणे : नेत्याने एखादी गाेष्ट अवलंबली तर त्याचे अनुकरण लाेक करत असतात. माेदी सत्तेवर येताच त्यांनी स्वच्छ भारत अभियानाची घाेषणा केली. या अभियानावरुन प्रेरणा घेत साेरतापवाडीचे सरपंच आणि भारतीय जनता युवा माेर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चाैधरी यांनी आपल्या गावात या अभियानाला सुरुवात केली. गेले 85 आठवडे दर रविवारी सकाळी 6 वाजता उठून गावकऱ्यांना साेबत घेत गावाची स्वच्छता करतात. स्वतः झाडू हातात घेत ते परिसर स्वच्छ करतात. रविवारी ( 13 जानेवारी) त्यांचे लग्न हाेते. लग्नाच्या दिवशी तरी सरपंच साहेब स्वच्छतेला येणार नाहीत असे गावकऱ्यांना वाटले परंतु चाैधरी हे लग्नाच्या दिवशी सकाळी सुद्धा गावाची स्वच्छता करण्यासाठी हजर झाले. सकाळी गावची स्वच्छता अन संध्याकाळी ते भाेवल्यावर चढले. 

सुदर्शन यांचा विवाह मेदनकरवाडीच्या सरपंच आणि भारतीय जनता युवा माेर्चाच्या प्रदेश सचिव प्रियांका मेदनकर यांच्याशी झाला. प्रियांका आणि सुदर्शन हे दाेघेही भाजपाचे सरपंच आहेत. प्रियांका यांनी आपल्या गावात विविध याेजना राबविल्या आहेत. गावाला डिजिटल साक्षर त्यांनी केले. तसेच संपूर्ण गावत वायफाय सुविधा त्यांनी सुरु केली आहे. तसेच मुली व महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन माेफत देण्याचा उपक्रमही त्या राबवितात. सुदर्शन आणि प्रियांका या दाेघांनाही समाजकार्याची माेठी आवड आहे. रविवारी या दाेघांचा विवाह पार पडला. 

सुदर्शन हे गेली 85 आठवडे गावात स्वच्छता उपक्रम राबवित आहेत. गावकऱ्यांसाेबत ते स्वतः दर रविवारी सकाळी गावाची स्वच्छता करतात. गावचा सरपंचच स्वच्छतेसाठी सकाळी हजर हाेत असल्याने गावकरीही त्यांना साथ देतात. यापुढेही हे अभियान असेच चालू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBJPभाजपाsarpanchसरपंचPuneपुणे