शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

कोल्हापूरकरांच्या मदतीला सरसावली पुणे महानगरपालिका; १७ टँकरसह २७ जणांचे पथक रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 1:00 PM

कोल्हापूर आयुक्तांनी पुणे महानगरपालिकेकडे टँकर ची मदत व्हावी केलेल्या या विनंतीवर पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देपुणे मनपा पथकाची निवासाची आणि खाण्याची संपूर्ण सोय कोल्हापूर महानगरपालिकेमार्फतकोल्हापूर महानगरपालिका यांनी मानले पुणे महानगरपालिकेचे आभार

पुणे : संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. कोकणबरोबरच, सांगली, कोल्हापूर सर्व भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसात तर दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत कार्य सुरु आहे. कोल्हापूर शहरातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. अक्षरशः शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. कोल्हापूरच्या काही भागात  जलशुद्धीकरणाचे काही प्लांटस बंद पडले आहेत. पंपिंग स्टेशन मध्ये पाणी घुसून साचल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली आहे. .

नागरिकांना पिण्याचे पाणी पोहोचवणे कठीण झाले आहे. त्यात कोल्हापूर महानगरपालिकेकडे टँकर अपुऱ्या संख्येत उपलब्ध आहेत. त्यामुळे अडचण होत आहे. कोल्हापूर आयुक्तांनी, या धर्तीवर पुणे महानगरपालिकेकडे टँकर ची मदत व्हावी अशी विनंती केली. प्रभारी आयुक्तांच्या सूचनेनुसार, पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले.

टँकर्स बरोबर सुपरवायजर, इलेक्ट्रीशियन, असे एकूण २७ जणांचे पथक आज कोल्हापूरला पोहोचले. साधारण एक आठवड्याच्या कालावधीची तयारी करण्यात आली आहे. या कालावधी मध्ये सगळ्यांच्या निवासाची तसेच खाण्याची संपूर्ण सोय कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.

आपत्ती च्या काळामध्ये, जितकी शक्य होईल तितकी मदत इतर शहरांना करायची पुणे महानगरपालिकेची परंपरा चालू ठेवण्यात आलेली आहे. वेळेत व तत्काळ मदत केल्याबद्दल आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांनी पुणे महानगरपालिकेचे आभार मानलेले आहेत

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाkolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरण