पुणे विमानतळाचे संचालकपदी संतोष ढोके यांची नियुक्ती, कुलदीप सिंग यांची श्रीनगरला बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 22:26 IST2021-08-07T22:26:09+5:302021-08-07T22:26:31+5:30
संतोष ढोके यांना यापूर्वी रायपूर, बडोदा येथे विमानतळ व्यवस्थापक म्हणून काम पहिले आहे

पुणे विमानतळाचे संचालकपदी संतोष ढोके यांची नियुक्ती, कुलदीप सिंग यांची श्रीनगरला बदली
पुणे : पुणे विमानतळाचे विमानतळ संचालक म्हणून संतोष ढोके यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. ते यापूर्वी श्रीनगर विमानतळ येथे विमानतळ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. कुलदीप सिंग यांच्या बदल्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संतोष ढोके यांना यापूर्वी रायपूर, बडोदा येथे विमानतळ व्यवस्थापक म्हणून काम पहिले आहे. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या दिल्ली येथे कार्यालयात कार्यरत होते. विमानतळ व्यवस्थापक म्हणून त्यांना जवळपास १० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.