Sameer Gaikwad Suicide : The last video of Tiktok star Sameer Gaikwad who committed suicide went viral, he told the fans ... | आत्महत्या करणारा Tiktok स्टार समीर गायकवाडचा अखेरचा व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना म्हणाला...

आत्महत्या करणारा Tiktok स्टार समीर गायकवाडचा अखेरचा व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना म्हणाला...

पुणे - हजारो फॉलोअर्स असलेला टिकटॉक स्टार समीर गायकवाडने रविवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. समीरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याचा चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी समीर गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमधून त्याने चाहत्यांना आवाहन केले आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समीर गायकवाड म्हणाला की, समोरच्यानं चहाचं दुकान टाकलं म्हणजे आपण ते नाही टाकायचं. तू दुधाचं टाक, त्याल्या दे. दोघे मिळून पुढे जा. पण नाही. आपल्याला तेच टाकायचं आहे. म्हणजे तो भिकारी आणि आपण कर्जबाजारी. अरे सुधरा खेकड्यांनो, असे त्याने आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. समीर मनीष गायकवाड (वय २२, रा. निकासा सोसायटी, केसनंद रोड, वाघोली) याने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी याची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली. समीर याने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला खाली उतरून लाईफ लाईन हॉस्पिटलला तातडीने नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे सांगितले. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर आले नाही. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिल्याचे घरात आढळून आले नाही. म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sameer Gaikwad Suicide : The last video of Tiktok star Sameer Gaikwad who committed suicide went viral, he told the fans ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.