अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विराेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:14 IST2018-10-25T19:00:08+5:302018-10-25T19:14:52+5:30
अरबी समुद्रातील स्मारक धाेकादायक ठरु शकणार असल्याने शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात न उभारता जमिनीवर तयार करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली अाहे.

अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विराेध
पुणे : अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात बाेट उलटून एका तरुणाचा जीव गेला. समुद्रातील शिवस्मारक धाेकादायक हाेऊ शकते त्यामुळे शिवस्मारक हे मुंबईत जमिनीवर राजभवन येथे उभे करावे असे म्हणत संभाजी ब्रिगेडकडून अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विराेध करण्यात अाला अाहे.
'शिवस्मारक' हे मुंबईत जमिनीवर राजभवन येथे ऊभे करावे. समुद्रातील शिवस्मारक धोकादायक होऊ शकते. पायाभरणीतच तरूणाचा पहिला जीव गेला. समुद्रात स्मारकाजवळ जाण्यास ३.१५ तास वेळ लागतो. एवढा वेळ जात असेल व प्रत्येक १००० रू. खर्च होणार असेल तर लोक जीव धोक्यात घालून येणार नाहीत. म्हणून सरकारने लोकांच्या जीवाशी न खेळता अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा निर्णय मागे घ्यावा व जमिनीवर शिवस्मारक करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली अाहे.
राजभवन, विधान भवन व मंत्रालय आपसात सहजपणे जोडता येईल. दररोज लागणारा ताफाही कमी होईल. सुरक्षा व्यवस्था सोपी राहील. म्हणून सरकारने निर्णय बदलावा अशी मागणीही संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली अाहे.