समता भूमी म्हणजे ऊर्जा स्थान - छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 05:04 IST2018-06-10T05:04:17+5:302018-06-10T05:04:17+5:30
समता भूमी हेच माझे पॉवर स्टेशन आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत येथे येऊ शकलो नाही. त्यामुळे अभिवादन करण्यासाठी येथे आलो, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी येथे दिली.

समता भूमी म्हणजे ऊर्जा स्थान - छगन भुजबळ
पुणे : समता भूमी हेच माझे पॉवर स्टेशन आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत येथे येऊ शकलो नाही. त्यामुळे अभिवादन करण्यासाठी येथे आलो, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी येथे दिली.
गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा येथे भेट देऊन महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ््यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धपान दिनानिमित्त आयोजित हल्लाबोल मेळाव्यासाठी ते पुण्यात आले आहेत. तसेच, आर्थिक घोटाळ््याच्या आरोपावरुन तुरुंगातून सुटल्यानंतर ते प्रथमच जाहीर सभेला हजेरी लावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांना विचारले असता, माझी भूमिका मेळाव्यात मांडेल असे त्यांनी सांगितले. तसेच मेळाव्याला आलोय याचा अर्थ राष्ट्रवादीतच आहे, असेही ते म्हणाले.