शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीला सलाम! संघर्षातून मिळविले दिव्यांग वैष्णवीने यश, शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 14:36 IST

वैष्णवीला नुकताच राज्य सरकारकडून सर्वाच्च शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले...

- रोशन मोरे

पिंपरी : पायाने ७५ टक्के दिव्यांग. चालताना प्रचंड त्रास. मात्र, तीच मुलगी स्विमिंग टँकमध्ये उतरली की जलपरी बनते. स्विमिंगची अशी कोणती स्पर्धा नाही की त्याच्यामध्ये तिने सुवर्ण यश मिळवले नाही. सलग नऊ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, कॉमनवेल्थ गेम्स २०१८, पॅरा स्विमिंग चॅम्पनशिप तसेच अमेरिका, ऑस्ट्रोलिया,दुबई, येथे झालेल्या आंतराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन यश मि‌ळवले. धडधाकट खेळाडूला ही लाजवेल अशी कामगिरी आहे पॅरालिंपीक जलतरणपटू वैष्णवी विनोद जगताप हिची आहे.

वैष्णवीला नुकताच राज्य सरकारकडून सर्वाच्च शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र, तिचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. संघर्षातून तिने यश खेचून आणले. वैष्णवी ही जन्मापासूनच दिव्यांग आहे. स्पायना बायफिडा या आजाराने ती ग्रस्त आहे. फिजोओथेरपीसने सांगण्यावरून उपचाराचा भाग म्हणून तिला ती तीन वर्षांची असताना तिचे आई वडिलांनी तिला स्विमींगसाठी घेऊन गेले. आणि पुढे तिला स्विमींगमध्ये प्रशिक्षित करणारे अभिजित तांबे सर भेटले. तेथूनच तिचा खेळाडू बनण्याचा प्रवास सुरु झाला.आई-वडिलांकडून प्रोत्साहन-

वैष्णवी सांगते की ती दिव्यांग आहे म्हणून तिला वेगळी वागणूक आणि तिच्या बहिणीला वेगळी वागणूक, असे घरात कधीच झाले नाही. चांगल्या कामगिरीचे कौतुक आणि चुक झाली की ओरडा ही ठरलेलं. आपल्या मम्मी-पप्पांनी आपल्याला स्विमिंगच्या स्पर्धेसाठी प्रेरित केले. मी डेक्कन येथील टिळक टँकमध्ये प्रॅक्टस करते मला पप्पाच तेथे सोडण्यासाठी येतात.

खर्चाचा सर्व भार कुटुंबावर-

वैष्णवी हिने राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर चमकली असली तरी तिला अजूनही कुठलेही प्रायोजकत्व मिळालेले नाही. तिच्या सर्व खर्चाचा भार हे तिचे कुटुंबीयच उचलतात. वैष्णवी हिने सरकारी  नोकरीसाठी खेळाडूंच्या कोटातून क्लेम करून ठेवले आहे. नुकतीच त्याविषयीची पुढील कागदपत्रे देखील तिने संबंधितांना दिली आहेत.

२०१२ मध्ये मी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. तेथे मिळालेल्या यशाने मला माझ्या क्षमतांची जाणीव झाली.  आता माझे सारे लक्ष्य हे एशियन्स गेम्सच्या तयारीमध्ये आहे. माझ्या यशाचे सारे श्रेय हे मम्मी, पप्पा आणि माझे प्रशिक्षक अभिजित तांबे यांचेच आहे. त्यांच्याच प्रोत्सानामुळे ही चांगली कामगिरी करु शकले. - वैष्णवी जगताप, आंतराराष्ट्रीय पॅरालिंपीक जलतरणपटू

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSwimmingपोहणेPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड