शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्पाईस जेट विमानाच्या उड्डाणावर बंदी असूनही तिकिटांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 13:50 IST

ऑनलाइन पोर्टलवरून स्पाईस जेट कंपनीच्या विमानाचे 'बुकिंग' घेऊन नंतर हे विमान (फ्लाईट) रद्द झाल्याचे सांगून आर्थिक फसवणुक केल्याची तक्रार दिली आहे. 

ठळक मुद्देनागरिकांची फसवणूक; मेक माय ट्रीप व स्पाईस जेटविरोधात तक्रार विमान रद्द झाल्याचे स्पाईस जेटकडून ६ मे रोजी ई-मेलद्वारे कळवण्यात आलेरद्द झालेल्या विमानांची ऑनलाईन तिकिटांची विक्री करून सदरच्या कंपन्या मोठा घोटाळा करत असण्याची शक्यता

पुणे (येरवडा): ' बोईंग ७३७ मॅक्स' या श्रेणीतील विमानांच्या वापरास बंदी असूनही 'मेक माय ट्रीप' या कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून स्पाईस जेट कंपनीच्या विमानाचे 'बुकिंग' घेऊन नंतर हे विमान (फ्लाईट) रद्द झाल्याचे सांगून आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी संबंधित ग्राहकांनी पुणे शहर पोलीस व नागरी विमान वाहतुक मंत्रालयाकडे तक्रार दिली आहे. महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण सदस्य अरविंद गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरीनाथ गरुड, शिवसेनेच्या युवा सेनेचे शहरप्रमुख नितीन भुजबळ,  व्यावसायिक गौरव शर्मा अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. या चौघांनी पुण्यातून जम्मू-काश्मिरमधील श्रीनगरला जाण्यासाठी 'मेक माय ट्रीप'वरून २२ एप्रिलला ४ जून २०१९ रोजीचे ऑनलाईन बुकिंग केले होते. त्यावेळी त्यांना इंडिगो एअरलाईन्सचे पुणे ते अहमदाबाद व स्पाईस जेटचे अहमदाबाद ते श्रीनगर अशा २ विमानांचे ऑनलाइन तिकीट देण्यात आले. यासाठी मेक माय ट्रिपकडून चौघांच्या तिकिटासाठी सुमारे ३९ हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. त्यानंतर भुजबळ व त्यांच्या मित्रांना अहमदाबाद-श्रीनगर दरम्यानचे विमान रद्द झाल्याचे स्पाईस जेटकडून ६ मे रोजी ई-मेलद्वारे कळवण्यात आले. यासाठी स्पाईस जेटकडून सरकारने बोईंग ७३७ मॅक्स या विमानांच्या वापरास बंदी घातल्याचे कारण दिले होते. यानंतर भुजबळ यांनी अधिक चौकशी केली असता, केंद्र सरकारच्या नागरी विमानवाहतुक मंत्रालयाच्या महासंचालकांनी २ महिन्यांपूर्वीच १३ मार्च २०१९ ला स्पाईस जेट कंपनीला त्यांच्याकडील बोईंग ७३७ मॅक्स या विमानांच्या वापरास प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी बंदी घातल्याचे निदर्शनास आले. जर सरकारने १३ मार्चला या विमानांच्या वापरावर बंदी घातली असेल, तर त्यानंतर जवळपास सव्वा महिन्याने २२ एप्रिलला व तेही पुढच्या २ महिन्यानंतरचे ४ जूनचे तिकीट मेक माय ट्रीप आणि स्पाईस जेटने दिलेच कसे, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. मात्र त्यांना मेक माय ट्रीपकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पुणे शहराचे पोलिस आयुक्त, बंडगार्डन व कोरेगाव पार्क पोलिस ठाणे, दिल्लीतील नागरी विमानवाहतुक मंत्रालयाकडे तक्रार दिली आहे.  भुजबळ म्हणाले, अशाप्रकारे हजारो नागरिकांना रद्द झालेल्या विमानांची ऑनलाईन तिकिटांची विक्री करून सदरच्या कंपन्या शेकडो कोटी रुपये जमा करून मोठा घोटाळा करत असण्याची शक्यता आहे. विमान रद्द झाल्याने मोठ्या मनस्ताप सहन करावा लागत असल्याने व तितकासा वेळ नसल्याने अनेक प्रवाशी विमान कंपनीने पैसे कापून दिलेला 'रिफंड' घेऊन गप्प बसतात.  याप्रकरणी मेक माय ट्रीपच्या पुण्यातील कार्यालयात संपर्क साधला असता, या प्रकरणाशी पुण्यातील कार्यालयाचा काहीही संबंध नाही. याविषयी आपल्याशी कंपनीच्या  कायदेशीर कार्यालयाकडून पुन्हा संपर्क साधण्यात येईल, असे सांगून लोकमत प्रतिनिधिकडून नाव व संपर्क क्रमांक घेण्यात आला. मात्र त्यानंतर कोणीही संपर्क साधला नाही.

टॅग्स :Puneपुणेspicejetस्पाइस जेटonlineऑनलाइनticketतिकिट