शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे आळंदीतून उद्या प्रस्थान; पोलीस बंदोबस्त तैनात, वारकऱ्यांची कोविड चाचणीही सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 13:30 IST

मंदिरात निमंत्रित वारकऱ्यांनाच दिला जाणार प्रवेश, वीणा मंडपातून पादूका बाहेर आणल्यानंतर टाळ - मृदुंगाच्या निनादात मंदिर प्रदक्षिणा होणार

ठळक मुद्देमाऊलींचे मंदिर व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. दुपारी चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात होणार.

भानुदास पऱ्हाड 

आळंदी: संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीच्या १९१ व्या सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान होणार आहे. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या चांदीच्याचलपादुका मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवणार आहेत. तत्पूर्वी माऊलींचे मंदिर व परिसराचे निर्जंतुकीकरण केले असून प्रस्थान संबंधित वारकऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. 

माऊलींच्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ वद्य अष्टमीला अर्थातच शुक्रवारी पहाटे चार ते साडेपाच वाजता माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व आरती होईल. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविला जाईल. नंतर दुपारी चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात होईल. मोजक्या ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख केला जाईल. त्यानंतर माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती होईल.

वीणा मंडपातून पादूका बाहेर आणल्यानंतर टाळ - मृदुंगाच्या निनादात मंदिर प्रदक्षिणा 

देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या पादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात देऊन मुख्य मंदिरातून चलपादुकांचे प्रस्थान होईल. वीणा मंडपातून पादूका बाहेर आणल्यानंतर टाळ - मृदुंगाच्या निनादात मंदिर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने पादुका लगतच्याच आजोळघरात फुलांनी सजविलेल्या आसनावर विराजमान केल्या जातील. आजोळघरातच माऊलींचा सतरा दिवस मुक्काम असणार आहेत. याठिकाणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दैनंदिन कीर्तन आणि जागरचा कार्यक्रम होईल. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज वारकऱ्यांची कोव्हीड चाचणी 

आळंदी येथून उद्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यात निमंत्रित वारकरी आणि ट्रस्टी यांना परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आज कोव्हीड चाचणी करण्यात येत आहे.  

राज्य सरकार आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला १९ जुलैला माउलींच्या चलपादुका लालपरीतून पंढरपूरीला विठुरायाच्या भेटीला घेऊन जाणार आहेत. दरम्यान अलंकापुरीत संचारबंदी लागू असल्याने समाधी मंदिर बंद आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यास परवानगी शिवाय कोणीही येऊ नये असे आवाहन आळंदी सोहळा प्रमुख विश्वस्त अॅड . विकास ढगे - पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर