शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘सेफ्टी शूज’ करणार महिलांची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 1:07 PM

महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण संशोधन करणारे हे विद्यार्थी बारामतीकरांच्या, पालकांच्या कौतुकाचा विषय..

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी केले संशोधन : ‘जीपीएस लोकेशन, व्हॉईस रेकॉर्डिंगसह इलेक्ट्रिक करंटची सुविधाएकट्या महिलांना छेडछाडीसह गंभीर प्रसंगांना जावे लागते सामोरे

प्रशांत ननवरे - बारामती : गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांवरून दिवसागणिक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच आला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी स्पेशल अ‍ॅप, हेल्पलाइन नंबर इत्यादी सुविधा उपलब्ध असूनदेखील निरर्थक ठरत आहे; मात्र बारामती शहरातील क्रिएटिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षेसाठी संशोधन करून यशस्वी केलेला ‘सेफ्टी शूज’चा प्रयोग पथदर्शी ठरणार आहे. या शूजमध्ये महिलांचे जीपीएस लोकेशन, व्हॉईस रेकॉर्डिंग, इलेक्ट्रिक करंट आदी महिला सुरक्षेसाठी पूरक असणाऱ्या सुविधा आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण संशोधन करणारे हे विद्यार्थी बारामतीकरांच्या, पालकांच्या कौतुकाचा विषय ठरले आहे. अनेकदा महिला नोकरी-व्यवसायानिमित्त तसेच बाजारात किंवा अन्य ठिकाणी एकट्या जातात. काही वेळा या ठिकाणी एकट्या महिलांना छेडछाडीसह गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागते. महिलांच्या सुरक्षेबाबतच्या चिंतेने समाजाच्या मनात घर केले आहे. याला विद्यार्थीदेखील अपवाद नसल्याचे आज करण्यात आलेल्या प्रयोगावरून सिद्ध झाले आहे. क्रिएटिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘सेफ्टी शूज’च्या प्रयोगाने महिलांना मोठा आधार मिळणार आहे. आता कोणत्याही महिलेला एकटं बाहेर पडण्याची भीती वाटणार नाही. शहरातील प्रगतीनगरमधील क्रिएटिव्ह स्कूलमध्ये दोन दिवसांचे शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित नुकतेच पार पडले.  इ. ८ व ९ वीचे विद्यार्थी पूर्ण उत्साहाने या प्रदर्शनात सहभागी झाले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन धो.आ. सातव हायस्कूलचे मुख्याध्यापक  जी. आर.  गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूलचे पर्यवेक्षक व्ही. डी. बाबर, बारामती विज्ञान परिषदेचे सदस्य ए. जी. मलगुंडे उपस्थित होते.  प्रकल्पाचे मार्गदर्शन विज्ञान शिक्षक रेवणनाथ म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब  घाडगे, प्रा. शशिकांत  काळे, मुख्याध्यापक रामचंद्र  साळुंके यांनी अभिनंदन के ले...........उत्कर्ष दानाने, ऋषभ देसाई या विद्यार्थ्यांनी महिला स्वसंरक्षणासाठी प्रदर्शनात मांडलेला ‘सेफ्टी शूज’ हा प्रयोग विशेष आकर्षण ठरला या शूजचा उपयोग करून विशेषत: महिलांना स्वरक्षण  प्रभावीपणे करता  येईल. प्रभावी

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक महत्त्वपूर्ण सुविधा यामध्ये पुरवण्यात आल्या  आहेत. यामध्ये जीपीएस लोकेशन, व्हॉईस रेकॉर्डिंग, बॅकडेटेड डाटासह इलेक्ट्रिक करंट अशा महिला सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अडचणीत असलेल्या महिलेचे लोकेशन नातेवाईक, पोलिसांना समजणार आहे. 

संबंधितांचा आवाजदेखील महिला या शूजमध्ये रेकॉर्ड करू शकतील. तसेच, वेळप्रसंगी संबंधिताला इलेक्ट्रिक शॉक देऊन महिलांना त्यांची सुटका करून घेता येईल. या शूजची पोलीस प्रशासनाच्या निर्भया पथकाच्या अमृता भोईटे यांनी विशेष दखल घेतली. 

या पथकाच्या भोईटे यांनी ‘सेफ्टी शूज’ला विशेष पसंती दाखवून तो भविष्यामध्ये मुलीकरिता एक महत्त्वाची संरक्षण बाब ठरेल, असे मत य ावेळी व्यक्त केले. 

टॅग्स :BaramatiबारामतीWomenमहिलाPoliceपोलिस