शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

‘त्यांच्या ’ मुळेच आपण सर्व सुरक्षित : राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 20:34 IST

मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी दुर्लक्ष केले तर काय काय भोगावे लागू शकते याचा अंदाज पण कुणी करू शकणार नाही.

ठळक मुद्देराज ठाकरे यांच्या हस्ते ‘प्राईड आॅफ महाराष्ट्रीय मंडळ’ पुरस्कार प्रदान

पुणे : एका पक्षाचा नेता असल्याने पोलिसांशी कायमच संपर्क येतो. तुम्हीही जरा पोलिसांशी संबंध ठेवून बघा, मात्र त्यासाठी गुन्हे अंगावर घ्यावे लागतात अशा शब्दातं पोलिसांबरोबरच्या ’राज’कीय नात्याचे गमक  खास ‘ठाकरे’ शैलीत उपस्थितांसमोर उलगडले ...तरीही माझ्या मनात पोलिसांबददल नितांत आदर आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी दुर्लक्ष केले तर काय काय भोगावे लागू शकते याचा अंदाज पण कुणी करू शकणार नाही. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात चार पोलीस अधिका-यांना जीव गमवावा लागला...आज मुंबईमध्ये गाड्या भरून बाहेरून लोंढे येत आहेत, अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत...अशा भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कार्यकर्तुत्वाला सलाम केला. महाराष्ट्रीय मंडळाचे माजी सरचिटणीस कै. रमेश दामले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रीय मंडळातर्फे ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ‘प्राईड आॅफ महाराष्ट्रीय मंडळ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ठाकरे बोलत होते. फणसळकर यांनी पुरस्काराच्या रकमेत भर घालून 21 हजार रूपये संस्थेला देणगी दिली. याप्रसंगी पुरस्कार प्रदान समारंभ  माजी पोलीस आयुक्त श्रीकांत बापट, एअरमार्शल ( निवृत्त) भूषण गोखले, मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोपान कांगणे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्रातल्या अमराठी भाषिक पोलीस दलामध्ये विवेक फणसळकर यांच्यासारख्या मराठमोळ्या पोलिसांचा अभिमान आहे, अशा शब्दातं फणसळकर यांच्याविषयी ठाकरे यांनी गौरवोद्वगार काढले. अचानक जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा लगेचच पोलिसांना दूषण लावली जातात. पोलिसांना काय तर पैसे खायचे असतात, पण अख्खा देश पैसे खातो त्याचे काय? तुम्ही सणवार साजरे करीत असता तेव्हा हातात लाठी घेऊन ते तुमच्या  सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडत असतात.  ते दिसत नाही का? असे खडे बोलही त्यांनी जनतेला सुनावले. सत्काराला उत्तर देताना एखादी स्त्री माहेरी आल्यावर जशी भावना होते तशी आज अवस्था  झाली आहे. प्रेम आणि वात्स्यल्याचे वातावरण अनुभवत आहे. या शाळेने संस्थेने खूप भरभरून दिले.नैसर्गिकरित्या संस्थेत राहिलो अडवलं, बडवल आणि घडवलं आहे अशा भावनिक बोलातून संस्था आणि शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आजच्या शिक्षकांचे वाईट वाटते श्रीमुखात भडकविण्याचा त्यांचा नैसर्गिक अधिकार हिरावून घेतला आहे,यामुळे  मुलांना कधीच शिक्षकांचे प्रेम  काय असते ते कळणार नाही. मी ही शाळा, शिक्षिका विद्यार्थी यांचा खूप ऋणी आहे. हे ऋण फेडता येणार नाहीत. हा पुरस्कार पोलीस बांधवांना अर्पण करत असल्याचे ते म्हणाले. श्रीकांत बापट म्हणाले, पैशात गुंतवणूक कशी कारायची हे सगळे सांगतात पण आरोग्यामध्ये गुंतवणूक कशी करायची हे संस्थेने शिकविले हे मंडळ म्हणजे संस्काराचे विद्यापीठ आहे. भूषण गोखले यांनी  संस्थेकडून सक्षम नागरिक मिळवून देण्याची ग्वाही उपस्थितांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले. 

टॅग्स :Puneपुणे26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाRaj Thackerayराज ठाकरे