शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

पुणे शहरात लष्कराला पाचारण करणार ही अफवाच : पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 2:12 PM

समाजात अफवा पसरवून संभ्रम आणि भीती निर्माण करत असल्यास त्यामागे कुणाचे षडयंत्र आहे याची चौकशी केली जाणार...

ठळक मुद्दे दोषी आढळल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार मिलिटरीला पाचारण करणार ही अफवा जोरदारपणे व्हायरल झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त

पुणे :  सध्याच्या काळात जाणीवपूर्वक किंवा कुठल्या राजकीय हेतूने समाजात अफवा पसरवून संभ्रम आणि भीती निर्माण करत असल्यास त्यामागे कुणाचे षडयंत्र आहे याची चौकशी केली जाणार आहे. त्यात दोषी आढळल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात लष्कराला पाचारण करणार ही अफवाच असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. असे आवाहन पुण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. 

  सध्या शहरात मिलिटरीचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत. नागरिक या मेसेजची कुठंली शहानिशा न करता तो व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल करत आहेत. यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. गेल्या एक दोन दिवसांपासून शहरात मिलिटरीला पाचारण करणार ही अफवा जोरदारपणे व्हायरल झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर लष्कराला पाचारण करणार अशी अफवा कुणी पसरवत असल्यास त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी माहिती पुण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. शिसवे यांनी दिली आहे. 

.......................शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पोलीस दलातील सर्व कर्मचारी ज्या निष्ठेने आणि समर्पित भावनेने काम करत आहेत त्याचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व समस्त नागरिकांनी केले आहे. कुणी विकृत मानसिकता तसेच कुठल्या राजकीय हेतूने अफवा पसरवत आहेत. त्यांचा शोध घेतला जाईल. मात्र यासगळ्यात पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे.  - डॉ. रवींद्र शिसवे (सहआयुक्त पुणे पोलीस)

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस