शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

शहरात वाहतुकीचा नियमभंग ठरतोय ‘जीवघेणा’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 6:00 AM

वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच अपघातांचे प्रमाणही नियंत्रणात आलेले नाही. वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघनच अपघातास कारणीभुत ठरत आहे.

ठळक मुद्देशहरातील वाहनांचा आकडा पुढील दोन-तीन महिन्यांत ४० लाखाच्या घरात जाण्याची शक्यता जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत शहरात एकुण ८६४ अपघातया अपघातांमध्ये २६५ जणांचा मृत्यू तर ५०३ जण गंभीर जखमी

- राजानंद मोरे-  पुणे : वाहतुक नियमांचे उल्लंघन वाहनचालकांच्या जीवावर बेतत असून दिवसाआड एक ते दोन जणांना प्राणाला मुकावे लागत आहे. वाहन चालविताना निष्काळजीपणा केल्याने शहरात दररोज २ ते ३ अपघात होत आहेत. त्यात किमान चार जण जखमी होत असून त्यातील दोघा जणांना गंभीर स्वरूपाची दुखापत होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील काही वर्षात शहरातील वाहनांची झपाट्याने वाढत चालली आहे. शहरातील वाहनांचा आकडा पुढील दोन-तीन महिन्यांत ४० लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच अपघातांचे प्रमाणही नियंत्रणात आलेले नाही. प्रामुख्याने वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघनच अपघातास कारणीभुत ठरत आहे. वाहतुक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निष्काळजीपणे वाहन चालविणे, मद्यप्राशन किंवा डॅगचे सेवन करून वाहन चालविणे, वाहनाचा अनियंत्रित वेग, एकेरी रस्त्यावर विरूध्द दिशेने घुसणे, वाहनांना चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे या कारणांमुळे अपघात होत आहेत. अपघातांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत शहरात एकुण ८६४ अपघात झाले. या अपघातांमध्ये २६५ जणांचा मृत्यू तर ५०३ जण गंभीर जखमी झाले. त्याचप्रमाणे २३६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या आकडेवारीवरून दररोज सरासरी २ ते ३ अपघात होत असून त्यात दिवसाआड एक ते दोन जणांचा मृत्यू होत आहे. दररोज किमान दोघे जण अपघातात जखमी होत आहेत. अपघातातील गंभीर जखमींची संख्या मोठी आहे. या जखमींना अनेकदा कायमचे अपंगत्व येते. शहरातील अनेक किरकोळ अपघातांची पोलिसांकडे नोंदही होत नाही. त्यामुळे अपघातांचा आकडा यापेक्षा निश्चितपणे अधिक असेल. -----------------------रस्त्याविरूद्ध दिशेने वाहन घुसविण्यामध्ये अनेक वाहनचालक पटाईत आहेत. या घुसखोरीमुळे अनेकदा अपघात होतात. काही दिवसांपुर्वी अशाप्रकारे विरूध्द बाजूने रिक्षा आणत चालकाने अपघाताला निमंत्रण दिल्याचे उदाहरण ताजे आहे. या अपघातात रिक्षाला आग लागून चालकाचा मृत्यू झाला. शहरात भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. वर्दळीच्या रस्त्यावरही हे चालक वाहन वेगात दामटत असतात. त्यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविण्याची संख्याही लक्षणीय आहे. अनेक तरूण-तरूणी मोबाईल किंवा हेडफोन कानाला लावून दुचाकी चालविताना दिसतात. वाहतुक नियमांची माहिती नसताना रस्त्यांवर वाहने दामटणारेही अनेक जण आहेत. सिग्नल तोडून भरधाव जाणारे तर चौका-चौकात आढळून येतात. या बेशिस्तीमुळे स्वत:सह इतरांच्या जीवाला धोका असल्याचे भानेही अनेकांना राहत नाही.मागील तेरा महिन्यांमध्ये जानेवारी २०१८ मध्ये सर्वाधिक ८३ अपघात झाले होते. यामध्ये २७ जणांचा मृत्यू तर ४७ जण गंभीर जखमी झाले. सर्वात कमी ५१ अपघात ऑगस्ट महिन्यात झाले. या अपघातांमध्ये २३ जणांचा मृत्यू तर ३२ जण जखमी झाले. यावर्षी जानेवारीमध्येही अपघातांचे प्रमाण कमी राहिले आहे. या महिन्यात एकुण ५७ अपघात झाले. त्यात १५ जणांचा मृत्यू तर ४८ जण जखमी झाले.....................हेल्मेट घालून नियमभंगवाहतुक पोलिसांकडून हेल्मेटसक्ती सुरू केल्यानंतर हेल्मेट वापरणाऱ्या चालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, हेल्मेट घालून अनेक वाहनचालक सर्रासपणे वाहतुक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. वाहनाचा भरधाव वेग, सिग्नल तोडणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे हेल्मेटचा वापर सुरक्षित प्रवासाऐवजी केवळ दंडाचे पैसे वाचविण्यासाठी केला जातो, असेच चित्र आहे.................अपघाताची प्रमुख कारणे- वाहन चालविताना निष्काळजीपणा- मद्यप्राशन करून वाहन चालविणे- वाहनाचा भरधाव वेग- विरूध्द दिशेने वाहन चालविणे- चुकीचे ओव्हरटेकिंग- वाहन चालविताना मोबाईलचा वापर............................शहरातील अपघातांची स्थिती (दि. १ जानेवारी २०१८ ते ३१ जानेवारी २०१९)महिना        एकुण अपघात    अपघाती मृत्यू    गंभीर जखमी    जखमीजाने. १८    ८३        २७        ४७        २८फेबु्र. १८    ५९        १६        २२        ३१मार्च. १८    ७०        २९        ३६        १८एप्रिल  १८    ७४        २०        ५१        २१मे १८        ६७        १६        ४३        १८जुन १८    ५५        २१        २५        १९जुलै १८    ५५        १८        २२        २९ऑगस्ट १८    ५१        २३        २४        ०८सप्टे. १८    ६८        १९        ४४        १६ऑक्टो. १८    ८१        २६        ५७        १३नोव्हे. १८    ७४        २१        ४८        १२डिसें. १८    ७०        १७        ४७        १२जाने. १९    ५७        १५        ३७        ११-----------------------------------------------------------एकुण        ८६४        २६५        ५०३        २३६----------

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीस