शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

Corona Virus News : पुण्यात लग्नाला उपस्थित राहणाऱ्या ५० लोकांची 'आरटीपीसीआर' चाचणी बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 18:25 IST

...अन्यथा प्रत्येक व्यक्तीमागे 1 हजार रुपये दंड करणार

पुणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यात आता लग्नासाठी केवळ 50 लोकांच्या उपस्थितीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर आता उपस्थित सर्व शंभर टक्के लोकांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. तसचे ही चाचणी केली नसेल तर एका व्यक्तीमागे एक हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. 

गेल्या काही दिवसांत शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमा निमित्त होणारी गर्दी आणि मास्क न वापरणे, सुरक्षित सामाजिक अंतर न राखणे यामुळेच ही परिस्थिती ओढावली आहे. यामुळेच राज्य शासनाने रविवारी काढलेल्या आदेशात लग्न समारंभावर अधिक कडक निर्बंध घातले आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देशमुख यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशामध्ये कार्यालय मालकाकडून नियम व अटीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घ्यावे. पन्नास व्यक्तीची उपस्थिती ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर व्हिडीओ चालक, सुत्रासचालक यांच्यासह गृहीत धरावी, मंगल कार्यालय व्यवस्थापक / मालक यांनी लग्न समारंभाचे प्रवेशव्दारावर ऑक्सीमीटर, इन्फ्रा थर्मामीटर(थर्मल स्कॅनिंग गन) चा वापर करावा. प्रवेशव्दाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाईल क्र व स्वाक्षरी घ्याव्यात .ऐवढेच नाही तर विवाह समारंभ व अन्य कार्यक्रम झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी पाच दिवसात पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-यावर थेट गुन्हे दाखल करा व मंगल कार्यालयांचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश देखील देशमुख यांनी दिले आहेत.----हे आहे पुणे जिल्ह्यासाठीचे नवीन नियम - लग्न समारंभासाठी हजर राहणाऱ्या 50 जणांची नावे पोलीस ठाण्यात सादर करावीत. (ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर व्हिडीओ चालक, सुत्रासचालक यांच्यासह राहील) कार्यालय मालकाकडून नियम व अटीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घ्यावे.- लग्न समारंभास उपस्थित शंभर टक्के लोकांची आरटीपीसीआर करणे. - लग्न समारंभाचे ठिकाणी जास्तीत जास्त 50 व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) सहा फुट राखणे बंधनकारक राहील. लग्नसमारंभाचे ठिकाणी बसण्यासाठी व जेवण करताना सामाजिक अंतर राहील अशा पध्दतीने खुणा (मार्किग) कराव्यात. जेवण करताना मास्क काढल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारण्यावर निबंध ठेवावेत.- लग्न समारंभाचे ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक, वाढपे, आचारी, वाजंत्री, भटजी व वन्हाडी मंडळी यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.- लग्न समारंभाचे ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाऊन धुंकणे व असेही थुकणेस व मद्यपान करण्यास सक्त मनाई राहील. आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनिय कारवाईस पात्र राहील.- लग्नसमारंभासाठी विनावातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल / खुले लॉन / सभागृह वापरणेत यावी. कोणत्याही परिस्थीतीत वातानुकूलित सेवेचा (AC) चा वापर करणेत येऊ नये.- मंगल कार्यालय व्यवस्थापक / मालक यांनी लग्न समारंभाचे प्रवेशव्दारावर ऑक्सीमीटर, इन्फ्रा थर्मामीटर (थर्मल स्कॅनिंग गन) चा वापर करावा. प्रवेशव्दाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाईल क्र व स्वाक्षरी घ्यावी- लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग, खुच्च्या, लग्नाचा संपूर्ण हॉल, किचन, जेवणाचे ठिकाण, स्वच्छतागृह इत्यादी ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करुन वारंवार निजतुकीकरण करावे. तसेच स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करावी.- सोशल डिस्टन्सचा वापर व अन्य नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी एक किवा दोन प्रतिनिधी नेमावेत.- लग्न समारंभात कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी व सर्व नियम व अटी पालन करण्याबाबतजनजागृती करावी.- लग्नसोहळयाचा सर्व विधीची पाहणी करण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, कामगार तलाठी व पोलीसयांचे भरारी पथक कार्यरत करावे. या ठिकाणी नियमांचे उलंघन झाल्यास गुन्हे दाखल करावेत.- लग्न समारंभाचे ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे व वरील सर्व नियम व अटींचे पालन करतनसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल /सभागृह तात्काळ बंद करणेत येतील, विवाह समारंभ व अन्य कार्यक्रम झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी पाच दिवसात पोलीस ठाण्यात सादर करावी.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसmarriageलग्न