शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील प्रसिद्ध 'चितळे बंधू मिठाई' यांच्याकडे मागितली तब्बल २० लाखांची खंडणी; तक्रार करू, बदनामी करू अशा दिल्या धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 17:09 IST

एका शिक्षिकेसह तिघांना अटक, चितळेंनी दिलेल्या बनावट नोटा असलेली दोन हजार रूपयांची दहा बंडल स्वीकारताना आरोपींना पकडले रंगेहाथ

ठळक मुद्देव्यावसायिकाच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे दूधाबाबत इ-मेलद्वारे तक्रार केली. त्यानंतर प्रत्यक्ष आणि दूरध्वनीद्वारे दुधामध्ये काळ्या रंगाच्या सदृश्य पदार्थ आढळून आला आहे असे सांगून त्यांना वारंवार धमकी

पुणे: दुधामध्ये काळ्या रंगाच्या सदृश्य पदार्थ आढळून आला आहे. तुमच्याविरूद्ध अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रार करतो. हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा, अन्यथा तुमचे दुकान बंद करू. चालू देणार नाही. तुमची बदनामी करू, कोणालाही जिवंत सोडणार नाही अशा धमक्या देत पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चितळे व्यावसायिकांनी दिलेल्या बनावट नोटा असलेली दोन हजार रूपयांची दहा बंडल स्वीकारताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.  याप्रकरणी एका शिक्षिकेसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पूनम सुनील परदेशी ( वय 27 रा. 101 घोरपडी गाव), सुनील बेनी परदेशी (वय 49), करण सुनील परदेशी (वय 22) व अक्षय मनोज कार्तिक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नामदेव बाबुराव पवार (वय 63 सहाय्यक मार्केटिंग व्यवस्थापक, मेसर्स बी.जी चितळे डेअरी रा. पारस रिव्हेरा शिवाजी चौक, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनम परदेशी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका असून, सुनील परदेशी आणि करण परदेशी यांचा लॉंड्रीचा व्यवसाय आहे. पूनम परदेशी यांनी प्रसिद्ध व्यावसायिकाच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे दूधाबाबत इ-मेलद्वारे तक्रार केली. त्यानंतर प्रत्यक्ष आणि दूरध्वनीद्वारे दुधामध्ये काळ्या रंगाच्या सदृश्य पदार्थ आढळून आला आहे असे सांगून त्यांना वारंवार धमकी देण्यात आली. त्यांच्या धमक्यामुळे कंपनीने भीतीपोटी दोन हजाराच्या बनावट नोटा असलेले एकूण दहा बंडल असे वीस लाख रूपये आरोपींना दिले. ही रक्कम स्वीकारताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर त्यांचा साथीदार अक्षय मनोज कार्तिक याला भारत फोर्ज मुंढवा समोरून ताब्यात घेण्यात आले.

अक्षय कार्तिक याच्याविरूद्ध यापूर्वी वानवडी व मुंढवा पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा आणणे, दंगा मारामारीचे तीन गुन्हे तर सुनील परदेशी यांच्याविरूद्ध मुंढवा पोलीस स्टेशन येथे मारामारीचे दोन गुन्हे व करण परदेशी विरूद्ध मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी युनिट 1 चे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकbusinessव्यवसाय