आरपीएफ उपनिरीक्षकाला सीबीआयकडून अटक
By Admin | Updated: January 12, 2017 03:22 IST2017-01-12T03:22:59+5:302017-01-12T03:22:59+5:30
रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) उपनिरीक्षकाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

आरपीएफ उपनिरीक्षकाला सीबीआयकडून अटक
पुणे : रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) उपनिरीक्षकाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधीक्षक एम. आर. कडोळे यांनी दिली.
किशोर इंगळे असे अटक करण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. इंगळे हा आरपीएफमध्ये उपनिरीक्षक असून, त्याची नेमणूक पुणे स्थानकात आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर तसेच रेल्वेगाड्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून दरमहा आरपीएफचे काही कर्मचारी आणि अधिकारी हप्ते गोळा करतात. त्यातीलच एका विक्रेत्याला इंगळे त्रास देत होता. त्याच्याकडे दोन हजारांची लाच मागत होता. याबाबत विक्रेत्याने सीबीआयकडे तक्रार दाखल केली. सीबीआयच्या पथकाने आरपीएफ ठाण्याच्या आवारात सापळा लावला. त्या ठिकाणी दुपारी दोनच्या सुमारास विक्रेत्याकडून दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.