शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

पुणेकरांवर ‘रॉयल’ची मोहिनी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 20:24 IST

लष्करी वारशावर आधारीत ३५० एअरबोर्न ब्लू आणि स्टॉर्मरायडर सँड अशा दोन रंगात दुचाकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ठळक मुद्देया मोटरसायकलची किंमत रुपये १ लाख ६१ हजार ९८४ (एक्स शोरूम, पुणे) रुपये याशिवाय शर्ट, टी-शर्ट, कॅप, कॉलरवर लावायला ‘लेपल पीन्स’, बॅग आणि हेल्मेट देखील उपलब्ध

पुणे : रस्त्यावर मशिन गनसारखी धडधडत जाणाऱ्या रॉयल एन्फिल्डची जबरदस्त मोहीनी पुणेकरांवर पडली आहे. त्यामुळे शहरातून दर महिन्याला तब्बल १ हजार १०० ‘रॉयल’ वाहने रस्तावर येत असल्याची माहिती रॉयल एन्फिल्डकडून देण्यात आली. लष्करी रुबाब देणारी साडेतीनशे सीसी (क्युबिक कपॅसिटी) श्रेणीतील दोन नवीन वाहने चालकांना भुरळ घालण्यासाठी मंगळवारी (दि. २८) बाजारात दाखल झाली. रॉयल एन्फिल्डच्या भारतीय सशस्त्र दलांना गेल्या ६५ वर्षांपासून (१९५२) दुचाकी पुरवित आहे. रॉयल एनफिल्ड आणि लष्कराचे एक भावबंध निर्माण झाले आहे. या नात्याला नमन करण्यासाठी लष्करी वारशावर आधारीत ३५० एअरबोर्न ब्लू आणि स्टॉर्मरायडर सँड अशा दोन रंगात दुचाकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रॉयल एन्फिल्डचे अध्यक्ष रुद्रतेज (रुडी) सिंग यांनी या दुचाकीचे अनावरण केले. या मोटरसायकलची किंमत रुपये १ लाख ६१ हजार ९८४ (एक्स शोरूम, पुणे) रुपये आहे. या नवीन मोटरसायकलसोबत दुचाकी पोशाख, सामानाची पेटी तसेच स्टील इंजिन गार्डस यांच्यासह एकूण ४० मोटरसायकल अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध असतील. त्या जोडीला ग्राहक मोटरसायकलच्या अस्सल अ‍ॅक्सेसरीज कलेक्शनमधून निवड करू शकतील. या अ‍ॅक्सेसरीज दोन वर्षांच्या वॉरंटीसह मिळतील. या शिवाय शर्ट, टी-शर्ट, कॅप, कॉलरवर लावायला ‘लेपल पीन्स’, बॅग आणि हेल्मेट देखील उपलब्ध आहेत.  सिंग म्हणाले, ‘मेड लाईक अ गन’ हे बोधवाक्य रॉयल एन्फिल्डमध्ये सार्थ केले आहे. भारतीय लष्कराशी १९५० च्या सुरुवातीपासूनच बंध जोडले गेले. आजमितीस सशस्त्र दलांना मोटरसायकल पुरविणारे आम्ही सर्वात मोठे पुरवठादार आहोत. त्यामुळे लष्करी थाटातील या नव्या श्रेणी सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. --------------

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरIndian Armyभारतीय जवान