शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

बालगुन्हेगारी रोखण्यास मुख्याध्यापकांची भूमिका महत्वाची : डॉ. के. व्यंकटेशम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 18:55 IST

व्यसन, गुड टच बॅड टच, शिस्त आणि स्वांतत्र्य अशा विषयांवर त्यांनी मुलांना समुपदेश कसे करावे, याची माहिती

ठळक मुद्देविद्यार्थी सुरक्षितता कार्यक्रमात पोलीस आयुक्तांचे आवाहन

पुणे : घरानंतर लहान मुले सर्वाधिक काळ शाळेत आपल्यासमोर असतात. समाजातील बºया वाईट गोष्टींचा परिणाम त्यांच्यावर होत असतो. आजच्या काळात मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. मुलांचे समुपदेन करण्यासाठी शाळांना पुणेपोलिसांच्या कम्युनिटी पोलिसिंगकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असे पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम यांनी सांगितले. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित विद्यार्थी सुरक्षितते संदर्भात मुख्याध्यापकांची कार्यशाळा पोलीस आयुक्तालयात गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ.व्यंकटेशम बोलत होते. पोलीस आयुक्तालयात गुरुवारी औंध व बिबवेवाडी परिसरातील सर्व खासगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्याध्यापकांना प्रामुख्याने सायबर क्राईम व सोशल मीडियाचा गैरवापर करुन गुन्हे कसे होतात, वाहतूक नियमन, अंमली पदार्थांचे मुलांमधील वाढत असलेले व्यसन, गुड टच बॅड टच, शिस्त आणि स्वांतत्र्य अशा विषयांवर त्यांनी मुलांना समुपदेश कसे करावे, याची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, विशेष बाल सुरक्षा प्रतिबंधक पथकाच्या शिल्पा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सह पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला महापालिकेचे शिक्षणाधिकारी दीपक माळी, शशिकला रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सत्रात २५० मुख्याध्यापक उपस्थित होते़ यावेळी काही मुख्याध्यापकांनीही आपले अनुभव व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही़ मुले बिघडल्यास पालक जबाबादार आहे.याकरीता मुलांपेक्षा त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे ज्योती भिलारे यांनी सांगितले. पुढील दोन दिवस शहरातील अन्य शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापिकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.़़़़़योग्य संस्कार, मार्गदर्शनाने मुले नक्कीच सुधारतातमुलांना योग्य संस्कार आणि वेळेवर मार्गदर्शन मिळाल्यास मुले नक्कीच कतृत्ववान बनू शकतात, असा स्वत:चा अनुभव दिग्वीजय प्राथमिक इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका जयश्री घाटगे यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, धनकवडी येथील एक मुलगा तेथील मंडळात होता. तलवारीने मारामारीपर्यंत त्याची मजल गेली होती. त्याच्या आईवडिलांनी ६ वीत असताना त्याला आमच्या शाळेत आणले, तो हाताबाहेर गेला असल्याचे आईने सांगितले. त्या मुलाला विश्वासात घेऊन मार्गदर्शन केले. त्याने हळुहॅळु सर्व नाद सोडून दिला. आता तो इतका शांत झाला असून आईवडिलांचा आदर करु लागला असून आता स्वत:चा व्यवसाय करत आहे़ पालकांचे समुपदेशन यात महत्वाचे असते. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी