"रोहित पाटीलने फक्त एकच नगरपंचायत जिंकली...", चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 13:24 IST2022-01-24T13:23:34+5:302022-01-24T13:24:24+5:30
या निवडणुकीमुळे रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची विजय सुरुवात...

"रोहित पाटीलने फक्त एकच नगरपंचायत जिंकली...", चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
पुणे: कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत ( Kavathe Mahankal nagar panchayat election) करिष्मा घडवून आणलेल्या रोहित पाटील (rohit patil) यांचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पहिल्याच निवडणुकीत रोहित पाटील यांनी नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीमुळे रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची विजय सुरुवात झाली असून सर्वपक्षीय नेते रोहित पाटील यांचं कौतुक करताना दिसत आहेत. त्यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी देखील रोहित पाटील यांच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यात एक नगरपंचायत जिंकली. 17 पैकी 10 जागा त्यांनी जिंकल्या. त्याच जिल्ह्यात कडेगाव नगरपंचायतीत आम्ही 17 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आम्ही काही कमी नाही. कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी तो मेहनत करतो, यश मिळवतो आणि ते अभिनंदनीय असतं. अगदी त्याचप्रमाणे समोर दिग्गज असताना रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये मिळवलेलं यश हे कौतुकास्पद आहे.
काही दिवसापूर्वी झालेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत एक हाती विजय मिळवत रोहित पाटील यांनी एकत्र आलेल्या विरोधकांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात करून पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना मोठं पद दिले जाणार असल्याची ही चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना दिली जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.