पुणे:महाराष्ट्रात गुन्हेगारीबरोबरच महिला अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पुण्यातील स्वारगेट प्रकरणानंतर पोलीस आणि प्रशासन दोघांवरही अनेक सवाल उपस्थित होऊ लागेल आहेत. विरोधकांकडून सरकारवर ताशेरे ओढले जाऊ लागले आहेत. गृहखात्यावरही टीका होऊ लागली आहे. अशातच रोहिणी खडसे यांनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर निशाणा साधला आहे.
पोलिसा यंत्रणा कडक कारवाई का करत नाही? महिला अत्याचार झाल्यावर त्यांना अत्याचार सहन करावा लागत आहे. कारवाई उशीर होत आहे. अनेक वर्षी न्याय मिळत नाही. चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं एवढेच काम करतात महिला आयोग आणि राज्याच्या महिला अध्यक्षा करत आहेत. त्या कुठल्या एका पक्षाच्या नाहीत असा खडसे म्हणाल्या आहेत. महिला अत्याचार पुण्यात घडत आहेत. पुणे तिथे काय उणे आधी म्हणायचे मात्र आता मी तिथं गुन्हेच गुन्हे होत आहेत. रोज पुण्याचं आता गुन्हे नाव करून द्यायला कायम होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलाही जिल्हा राहिलेला नाही. अत्याचाराच्या घटनांची आमच्या आंदोलनाच्या माध्यमातनं सरकारकडे एकच मागणी आहे की शेवटी जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला आहे. त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असती. तो शक्ती कायदा तीन साडे तीन वर्ष झाले अडगडीत पडला आहे. तो का मंजूर केला गेला नाही. असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत. त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाही आहे. काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत. स्वारगेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते. त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत. अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचार ाच्या घटना नोंद आहेत. त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत. त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. म्हणजे त्या कुठल्यातरी एका पक्षाच्या आहेत. त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीत.
मंत्र्यांचे तर खरे सत्कार केले पाहिजेत रोज उठायचे आणि महिलांच्या बाबतीत अपशब्द काढायचे असं ते काम करत आहेत. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करते. पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा, मिरची पावडर ठेवा तेव्हा आणि तुमचे तुम्ही संरक्षण करा असं सरकार करणार आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. लाडक्या बहिणींना मत मिळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभन देण्यात आली. लाडक्या बहिणींच्या आयुष्यात मानधन वाढ करून देऊ असं म्हटले होते. आज अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत. दिलेली संपूर्ण आश्वासन या सरकारने पूर्ण करावी एवढीच अपेक्षा आहे.