शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

बारामतीत महिलेचे हातपाय बांधून कोटींचा दरोडा; ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त, ६ जण जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 19:36 IST

पती तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्यावर महिला २ मुलांसह घरात असताना चोरटयांनी टाकला दरोडा

बारामती : एप्रिल महिन्यात शहर परीसरातील देवकातेनगर परीसरात एका कुटुंबातील एका महिलेचे महिलेचा हात-पाय बांधत तिला मारहाण करीत  १ कोटी ७ लाखांचा दरोडा सुमारे साडेतीन महिन्यांनंतर उघडकीस आला आहे.पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने  या प्रकरणी सहाजणांना अटक केली आहे.ज्योतिषाकडून मुहुर्त काढुन आरोपींनी हा गुुन्हा केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन अशोक जगधणे (वय ३०, रा. गुणवडी, २९ फाटा, ता. बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय ३२, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), रविंद्र शिवाजी भोसले (वय २७, रा. निरावागज, बारामती), दुर्योधन उर्फ दिपक उर्फ पप्पू धनाजी जाधव (वय ३५, रा. जिंती हायस्कूलजवळ, ता. फलटण, जि. सातारा), नितीन अर्जून मोरे (वय ३६, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह रामचंद्र वामन चव्हाण (वय ४३, मूळ रा. आंदरुड, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. वडूज, ता.खटाव, जि. सातारा) अशी या दरोड्यातील आरोपींची नावे आहेत.

देवकातेनगर येथे सागर शिवाजी गोफणे व त्यांची पत्नी दोन मुलांसह राहतात. दि. २१ एप्रिल रोजी सागर हे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. तर त्यांची पत्नी व मुले घरी होती. यावेळी रात्री आठ वाजता अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडवरून प्रवेश केला. पत्नीला मारहाण करत त्यांचे हात-पाय बांधले. तोंडात कापडाचा बोळा कोंबून घरात प्रवेश केला होता. ९५ लाख ३० हजाराची रोख रक्कम, ११ लाख ५९ हजार रुपयांचे २० तोळे दागिने, ३५ हजार रुपयांचा मोबाईल असा १ कोटी ७ लाख रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला होता. याबाबत अज्ञातांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात दरोड्यााच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली होती. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी हे स्वत: या तपासाबाबत लक्ष ठेवुन होते. त्यानुसार पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेची पथके नेमली होती. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या आधारे अखेर दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले. विशेष म्हणजे आरोपींनी आपण पकडले जावू नये, याची पुरेपुर खबरदारी घेतली होती. कोणताही मागमूस मागे ठेवला नव्हता. या गुन्ह्यातील आरोपी एमआयडीसीतील मजूर असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या घटनेत अद्यापपर्यंत पोलिसांनी ७६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात ६० लाख ९७ हजाराची रोख रक्कम असून १५ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २६ तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यातआले आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीHomeसुंदर गृहनियोजनPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार