शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड रोड येथे दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 11:41 IST

सिंहगड रोडवरील धायरी येथील डी.एस. के स्कुलच्या मागील बाजूला असलेल्या घरावर ५ ते ६ जणांनी मध्यरात्री दरोडा टाकून तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रुपये असा ऐवज लुटून नेला.

ठळक मुद्देसिंहगड रोडवरील धायरी येथील एका घरावर ५ ते ६ जणांनी दरोडा टाकून १० तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रुपये असा ऐवज लुटून नेलाघराबाहेर असलेली दुचाकीही चोरुन नेली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पुणे - सिंहगड रोडवरील धायरी येथील डी.एस. के स्कुलच्या मागील बाजूला असलेल्या घरावर ५ ते ६ जणांनी मध्यरात्री दरोडा टाकून तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रुपये असा ऐवज लुटून नेला. तसेच घराबाहेर असलेली दुचाकीही चोरुन नेली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील डी. एस. के स्कुलच्या मागील बाजूला बाळू पोकळे यांचे शेतात घर आहे. त्यांच्या आजू बाजूला लांबवर वस्ती नाही. बाळू पोकळे, त्यांची पत्नी, आई वडिल हे घरात झोपले असताना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ४ ते ५ जण आले. त्यांच्या आवाजाने बाळू पोकळे उठले. त्यांनी दार उघडताच ते घरात शिरले. सर्वांना धमकावत त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर त्यांनी आई व पत्नीच्या अंगावरील तसेच घरातील १० तोळे सोन्याचे दागिने, घरातील कपाट ठेवलेली दीड लाख रुपयांची रोकड असा ऐवज जबरदस्तीने चोरला. त्यानंतर चोरांनी सर्वांना घरात कोंडले. घराबाहेर असलेली दुचाकी घेऊन ते पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.मंगळवारी सकाळी सिंहगड रोड पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :RobberyदरोडाPuneपुणेPoliceपोलिसThiefचोर