शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

किरकटवाडी, कोल्हेवाडी येथील रस्ते गेले खड्ड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 04:02 IST

खडकवासला ग्रामस्थ आणि मनसेचा आंदोलनाचा इशारा

खडकवासला : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी ते कोल्हेवाडी, खडकवासलापर्यंतचा रस्त्यावरील खड्ड्यात पाण्याची डबकी, राडारोडा साठून हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी; अन्यथा रविवारी (२६ आॅगस्ट) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा खडकवासला ग्रामपंचायत आणि मनसेने दिला आहे.कोल्हेवाडी फाट्यावरील केंद्रीय जलसंशोधन केंद्राच्या आवारातील कॅनरा बँकेच्या प्रवेशद्वारातच पाण्याचे मोठे तळे साठले आहे.किरकटवाडी फाट्यावरील जयप्रकाश नारायण नगरसमोरील रस्त्याची मोठमोठे खड्डे पडून चाळण झाली आहे. अशीच स्थिती नांदेड फाट्यावरील तसेच खडकवासला धरणमाथ्यावरील रस्त्याची झाली आहे. पाण्याची डबकी साठलेल्या खड्ड्यातून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात अडकून वाहने बंद पडत आहेत. रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशी वाहने घसरून तसेच मोठ्या खड्ड्यातील डबक्यात कोसळून अपघात होत आहेत. खड्ड्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटकांची वर्दळ या रस्त्यावर असते. अशा वेळी प्रचंड वाहतूककोंडी होत आहे.खडकवासला बाह्यवळण रस्त्यावरील खड्डे बुजविले असले तरी पावसामुळे पुन्हा चिखल, पाणी साठत आहे, असे मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महादेव मते यांनी सांगितले.खडकवासला ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौरभ मते यांनी खडकवासला, कोल्हेवाडी ते किरकटवाडी येथील रस्त्याची पावसामुळे झालेली चाळण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सहायक अभियंता नकुल रणसिंग आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांना सोमवारी प्रत्यक्ष बोलवून दाखवून दिली. नांदेड फाट्यापासून सिंहगड रस्त्यावरील खड्डे पाच दिवसांत बुजवून वाहतुकीयोग्य केले नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सौरभ मते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी उपसरपंच आदित्य मते, किरकटवाडीचे माजी सरपंच किरण हगवणे, अजय मते, नरेंद्र हगवणे, किरण कोल्हे, स्वप्निल मते आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सौरभ मते यांनी येथील रस्त्यावर साठलेल्या डबक्याबाबत आमदारांना निवेदन देताना प्रसिद्ध केलेली छायाचित्रे चर्चेचा विषय झाली आहेत.प्रत्यक्ष पाहणीआमच्या प्रतिनिधीने सिंहगड रस्त्याची नांदेडपासून डोणजे फाट्यापर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली. नांदेड सीटीच्या गेटपर्यंत रस्ता सहापदरी आणि सिमेंट काँक्रीटचा आहे. तेथून पुढे रस्त्याच्या आणि प्रवाशांच्या दुर्दशेला सुरुवात होते. तेथून पुढे रस्ता अरुंद आहे.नांदेड फाट्यावर अरुंद रस्त्यामुळे नेहमीच वाहतूककोंडी आहे. सुट्टीच्या दिवसांत येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पुढे कॅनॉलवर पुलाचे काम चालू असल्याने जुन्या अरुंद पुलावर खड्डे पडून रस्ता उखडलेला आहे. पूल संपताच वळण रस्ता आहे. वळणावरील उखडलेला रस्ता आणि पडलेल्या खड्ड्यातून रस्ता काढणे येथून वाहनचालकांची खरी कसोटी सुरू होते.या वळणावरील उखडलेला रस्ता आणि पडलेले खड्डे गेल्या दोन वर्षांपासून तसेच आहेत, असे प्रवाशांनी सांगितले. तेथून पुणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द ठरते. त्यामुळे हा खड्डा कोणी दुरुस्त करायचा? पुढे जल आयोग येथे रस्ता दिसत नाही.

टॅग्स :Potholeखड्डेPuneपुणे