शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

एनएफआयच्या खजिन्यात ‘आरके’ चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 3:32 AM

  राज कपूर यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांच्या चित्रपटांनी चित्रसृष्टीला वेगळी उंची प्राप्त करून दिली. याच चित्रपटाचा अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात दाखल होणार आहे.

पुणे -  राज कपूर यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांच्या चित्रपटांनी चित्रसृष्टीला वेगळी उंची प्राप्त करून दिली. याच चित्रपटाचा अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात दाखल होणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ११ जानेवारी रोजी रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्या हस्ते आरके प्रॉडक्शनच्या २३ चित्रपटांच्या मूळ निगेटिव्ह एनएफएआयकडे सुपूर्त केल्या जातील. यामध्ये बॉलीवूड, हॉलीवूड, रशिया, चीन येथील चित्रपटांचाही समावेश आहे. आवारा, श्री ४२०, आग, बरसात, मेरा नाम जोकर, संगम, धरम-करम, राम तेरी गंगा मैली, बॉबी आदी चित्रपटांच्या निगेटिव्ह एनएफआयच्या वॉल्टरमध्ये विराजमान होणार आहेत.जब्बार पटेल यांच्या पुढाकाराने संग्रहालयाच्या खजिन्यात ही मोलाची भर पडत असल्याचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. रणधीर कपूर यांनी २-३ महिन्यांपूर्वी एनएफएआयला भेट दिली होती. यावेळी त्यांनी दस्तावेज, संग्रहालयाची स्थिती, साठवण क्षमता, वॉलचा दर्जा, तापमान संतुलन आदींची पाहणी केली. त्यानंतर मूळ निगेटिव्हचा ठेवा संग्रहालयाकडे सुपूर्त करण्याचे आश्वासन दिले.यापूर्वी संग्रहालयाकडे राज कपूर यांच्या १५-१६ चित्रपट जतन करण्यात आले आहेत. राज कपूर रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये एनएफएआयतर्फे ‘बॉबी’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे. यावेळी अभिनेते ॠषी कपूर उपस्थित राहणार आहेत. पिफमध्ये आरके चित्रपटांचे पोस्टर प्रदर्शन हे चित्रपटप्रेमींसाठी खास आकर्षण ठरणार आहे.मूळ निगेटिव्ह हा संग्रहालयासाठी अत्यंत मोलाचा ठेवा आहे. पुढील पिढ्यांसाठी हा खजिना जतन करुन ठेवणे, अत्यंत गरजेचे आहे. मूळ निगेटिव्ह योग्य तापमानात जतन केल्यास १५० वर्षांपर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतात. या निगेटिव्हची स्थिती तपासून त्यांचे जतन, संवर्धन, डिजिटायझेशन, असेसमेंट याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.- प्रकाश मगदूम

टॅग्स :cinemaसिनेमाPuneपुणे