शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात वाढत्या प्रदूषणामुळे वाढले श्वसन विकार, घशाचा संसर्ग; गर्भवती महिलांवरही गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:43 IST

धुरकट वातावरण, वाहनांची वाढती संख्या, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि औद्योगिक उत्सर्जन ही प्रदूषणवाढीची प्रमुख कारणे ठरत आहेत

पुणे : शहरासह औद्योगिक परिसरात वाढत चाललेल्या वायुप्रदूषणामुळे श्वसन विकार, घशाचे संसर्ग आणि ॲलर्जीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांमध्ये याचा अधिक गंभीर परिणाम दिसून येत आहे. धुरकट वातावरण, वाहनांची वाढती संख्या, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि औद्योगिक उत्सर्जन ही प्रदूषणवाढीची प्रमुख कारणे ठरत आहेत.

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, घशात खवखव, दमा, ब्रॉन्कायटिस आणि श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही आठवड्यांत वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, हवेत असलेले सूक्ष्मकण, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड यांसारखे प्रदूषक थेट श्वसनमार्गावर परिणाम करतात. त्यामुळे घशाला सूज येणे, संसर्ग होणे आणि दमा तीव्र होणे अशी लक्षणे दिसून येतात.

दरम्यान, नागरिकांनीही वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी प्रदूषणाची पातळी जास्त असल्यास बाहेर पडणे टाळावे, ‘एन-९५’ मास्कचा वापर करावा, घरात एअर प्युरिफायरचा वापर करणे शक्य असल्यास करावा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा संतुलित आहार घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता, प्रशासन आणि नागरिकांनी मिळून प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे.

मुलांमध्ये ॲलर्जीचे प्रमाण वाढले

शाळकरी मुलांमध्ये वारंवार सर्दी-खोकला, श्वास लागणे आणि छातीत घरघर होण्याचे आणि संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. यासाठी बाळांना मातेकडून होणारे स्तनपान संरक्षण करू शकते. अलीकडच्या काळात बाळांना स्तनपान करण्याऐवजी बाहेरील प्रोस्टेड मिल्क दिले जाते. वाहनांचा धूर, बांधकामातील आणि रस्त्यावरील धूळ आदी प्रदूषणामुळे अस्थमा ट्रिगर होत असून, मुलांमध्ये नाक चोंदणे, श्वास घेण्यास तक्रारी वाढत आहेत. धुळीसोबत इतर संसर्गजन्य विषाणूही श्वासावाटे थेट शरीरात प्रवेश करतात. देशात होणाऱ्या बालमृत्यूंमागे न्यूमोनिया, वाढलेला संसर्ग आणि संबंधित गुंतागुंत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी मुलांना घराबाहेर घेऊन जाताना त्यांच्या तोंडावर मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. - डॉ. शैलेजा माने, बालरोगतज्ज्ञ.

गर्भधारणेवरही परिणाम

वाढते वायुप्रदूषण गर्भधारणेवरही विपरीत परिणाम करू शकते. संशोधनानुसार प्रदूषित हवेत दीर्घकाळ राहिल्यास विशेषत: सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींकडून होणाऱ्या वायुप्रदुषणामुळे अकाली प्रसूती, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, तसेच गर्भाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांनी शक्यतो प्रदूषण जास्त असलेल्या भागात जाणे टाळावे, बाहेर पडताना योग्य मास्कचा वापर करावा आणि घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. सकाळच्या वेळेत प्राणायाम केल्यास शरीराची ऑक्सिजन पातळी चांगली राहिल्याने गर्भातील बाळांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरेल. - डॉ. शिल्पा नाईक, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ

घशाच्या संसर्गात वाढ

हवेत वाढलेल्या धुळीमुळे घशात कोरडेपणा, जळजळ आणि संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. वारंवार घसा बसणे, आवाज बसणे किंवा गिळताना त्रास होणे अशी लक्षणे आढळत आहेत. पुरेसे पाणी पिणे, कोमट पाण्याने गुळण्या करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स न घेणे आवश्यक आहे. - डॉ. संतोष माने, कान-नाक-घसातज्ज्ञ

प्रशासनाने शहरातील प्रदूषणावर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करावी. रस्त्यांवर नियमित पाणी फवारणी, बांधकामस्थळी धूळ प्रतिबंधक जाळी लावणे यांसारखे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे आणि वृक्षारोपण यावर भर देणे आवश्यक आहे. - ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी नागरिक

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Pollution Surge: Respiratory Issues, Throat Infections Rise, Impacting Pregnant Women

Web Summary : Pune faces rising respiratory illnesses and throat infections due to pollution, affecting children, seniors, and pregnant women. Doctors advise precautions like masks and air purifiers. Pollution impacts pregnancies, and children face increased allergies. Stricter pollution control measures are needed.
टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषणHealthआरोग्यWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिलाdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका